श्री आदिनाथ साखर कारखान्याचा २२ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम सांगता समारंभ- चेअरमन धनंजय डोंगरे
श्री आदिनाथ साखर कारखान्याचा २२ फेब्रुवारी रोजी गळीत हंगाम सांगता समारंभ- चेअरमन धनंजय डोंगरे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून कारखाना गळीत हंगाम सुरू करण्यास मोलाची साथ दिली त्यामुळेच आदिनाथ अपेक्षेप्रमाणे गाळप करु शकला आहे याची जाणीव आम्हाला आहे आम्ही सुध्दा ऊस पुरवठा करणा-या शेतकऱ्यांना ऊसाचे बिल रोखीने अदा करून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे करमाळा तालुक्यातील ऊस क्षेत्र आटोक्यात आल्या मुळे आदिनाथ कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ २२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे कारखान्यामध्ये ७५००० मे. टन गळीत झाले आहे अशी माहिती चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली आहे. आदिनाथ कारखाना हे ऊस उत्पादक सभासदांचे मंदिर आहे व या पवित्र मंदिरामध्ये आम्ही सर्वांचे सहकार्याने मिळून काम करीत आहोत आदिनाथ कारखाना ही करमाळा तालुक्यातील पहिली सहकारी संस्था असून यावर हजारो लोकांचा संसार अवलंबून आहे, याची आम्हाला निश्चितच जाणीव आहे आदिनाथ कारखाना सुरू व्हावा ही तमाम सभासदांची इच्छा होती मागील तीन वर्ष आदिनाथ कारखाना बंद असल्याने या हंगामामध्ये कारखाना चालू होणार नाही अशी परिस्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, आणि तालुक्यातील सभासदांच्या सहकार्यामुळेच आम्ही कारखाना चालू करु शकलो आहोत यासाठी आम्हाला माजी आमदार नारायण आबा पाटील, तसेच आमच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांचे मार्गदर्शन लाभले आहे ही आम्हाला अतिशय आनंद देणारी व अभिमानास्पद गोष्ट आहे असे आम्हाला वाटते व हे केवळ आम्ही शक्य करु शकलो ते आदिनाथ कारखान्याच्या हितचिंतकांच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने ही गोष्ट आम्ही विसरू शकत नाही. श्री आदिनाथ कारखाना सांगता समारंभानिमित्त बुधवारी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.