केम गावावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक
केम गावावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक केम (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केम ग्रामपंचायतीच्या वतीने गावात प्रमुख चौकात आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या आणि कौतुकास्पद प्रकल्पासाठी केमचे ग्रामसेवक वैभव तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांच्या या दूरदृष्टी आणि उत्कृष्ट नियोजनाचे ग्रामस्थांमधून जोरदार कौतुक होत आहे. केम हे परिसरातील एक मोठी बाजारपेठ आणि मुख्य केंद्र असलेले गाव आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच गावातील अंतर्गत सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि मुख्य चौकातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे बनले होते. हीच गरज ओळखून ग्रामसेवक वैभव तळेकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात हाय-डेफिनिशन (HD) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले आहे. गावातील मुख्य प्रवेशद्वारे, बाजारपेठ परिसर आणि प्रमुख चौकांवर आता २४ तास तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्या कामगिरीचा गौरव क...