शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, आमदार नारायण पाटील यांचा महावितरणला इशारा

शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा मी स्वतः रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, आमदार नारायण  पाटील यांचा महावितरणला इशारा

सोमवार ८ जुन रोजी मोर्चाचे आयोजन

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीज देण्याची व्यवस्था करा तसेच वीजे संदर्भात शेतकऱ्यांनी मागणी केलेले प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा सोमवार दिनांक  ८ जुन २०२६ रोजी आपण स्वतः शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार नारायण आबा पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. वीजेचे प्रश्न प्रलंबित असल्याने याबाबत आमदार नारायण  पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले असुन या निवेदनात शेवटी प्रश्न मार्गी नाही लागले तर  सोमवारी दिनांक ८ जुन रोजी करमाळा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे नमुद केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण  पाटील यांनी सांगितले की सध्या करमाळा तालुक्यातील अनेक गावांना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चुकीच्या वीज पुरवठा धोरणांचा फटका बसत आहे. आपण करमाळा मतदार संघातील वीजेची मागणी व पुरवठा यांचे गणित जुळवण्यासाठी ३३/११ केव्हीए क्षमतेची नवीन सबस्टेशन तसेच ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफार्मर प्राप्त करुन दिले परंतु तरीही यावरील फिडर आणि लाईनची कामे दिरंगाईने केली जात आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असुन उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे आता आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांना या बाबीची गंभीरता समजली जावी व तातडीने शेती पंपाचा वीज पुरवठा पुर्ण दाबाने व अखंडीत पणे दिला जावा यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार नारायण  पाटील यांनी जाहीर केले आहे.  आमदार कार्यालयाकडून सोमवार दिनांक ८ जुन रोजी दुपारी १२ वाजता करमाळा येथील तहसिल कार्यालयावर आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार असलेल्या मोर्चाची तयारी सुरू केली गेली आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी