रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

 बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समीकरण आता अंतिम टप्प्यात आले असून, अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या रश्मी बागल यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून, त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
करमाळ्याला ऐतिहासिक संधी?
​सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात करमाळा तालुक्याला विशेष महत्त्व आहे. जर रश्मी बागल यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर करमाळा तालुक्याला दुसऱ्यांदा हे मानाचे पद भूषवण्याची संधी मिळेल. 

​बागल गटाचे तालुक्यात असलेले वर्चस्व आणि रश्मी बागल यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे.
 ​नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत करमाळ्यातून भाजपच्या उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला आहे. महायुतीच्या जागावाटपात आणि सत्तेच्या समीकरणात करमाळ्याला झुकते माप मिळण्याची चिन्हे आहेत.
​जिल्हा परिषदेत महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या उद्देशानेही त्यांच्या नावाचा विचार गांभीर्याने केला जात असल्याचे समजते.​
​जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू असतानाच, रश्मी बागल यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर येत आहे. करमाळ्यातील कार्यकर्त्यांमध्ये या चर्चेमुळे उत्साहाचे वातावरण असून,
​मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत इतरही काही दिग्गज नावांची चर्चा असल्याने, अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. येत्या काही दिवसांतच अध्यक्ष निवडीच्या विशेष सभेमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी