केम येथे छत्रपती शिवाजी महाराज 'महाराजस्व अभियाना'चा शुभारंभ केम मंडळात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
केम येथे छत्रपती शिवाजी महाराज 'महाराजस्व अभियाना'चा शुभारंभ केम मंडळात अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या अभियानाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. महसूल विभागाच्या सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासनाची तत्परता आणि लोकसहभाग
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले की, "महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, सातबारा उतारे, विविध दाखले आणि शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे." प्रशासकीय कामात सुसूत्रता आणून पारदर्शकता वाढवण्यासाठी हे अभियान आहे
हे अभियान यशस्वी करण्यासाठी केम मंडळाच्या मंडल अधिकारी नागटिळक मॅडम आणि तलाठी राजाभाऊ आदलिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन चोख करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना घटनास्थळीच मार्गदर्शन करण्याचे काम मंडळातील तलाठी प्रमोद चव्हाण , संदीप ठोंबरे सायली शिंदे ,या पथकाने केले. ह्या योजनेचा लाभ पुढीलप्रमाणे देण्यात आला पुरवठा विभागामार्फत -54व्यक्तींना विविध दाखले देण्यात आले . महसुल विभागामार्फत 94व्यक्तींना उत्पनाचे दाखले देण्यात आले आरोग्य विभागामार्फत
पशु वैदयकीय विभागामार्फत 60 जनावरांना जंतुनाशक व 58 जनावरांना गोचीडनाशकाचे वाटप करण्यात आले आरोग्य विभागामार्फत 28 (पेशन्ट)ना गोळ्या औषधं देण्यात आले , सेतु विभागामार्फत 25व्यक्तींना उत्पनाचे व ८ डोमासाइल दाखले देण्यात आले, गैस विभागामार्फत २२ kyc करण्यात आल्या,महिला बालविकास विभागामार्फत ६ कीट वाटण्यात आल्या . आाधार विभागामार्फत6 अपडेट व 5 आधार सेडींग करण्यात आले , महावितरण विभागामार्फत१६ तक्रारी चा निपटारा करण्यात आला , कृषी विभागामार्फत pm किसान १५ व्यक्तींना लाभ देण्यात या शिबिरासाठी गणेश नवले, बाबू उघडे हनमंत खरवडे यांनी परिश्रम घेतले या समाधान शिबिरासाठी केम मंडळातील सर्व गावातील व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला