नुकसानीचे पंचनामे व वीज पुरवठा पूर्ववत ठेवणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन...
नुकसानीचे पंचनामे व वीज पुरवठा पूर्ववत ठेवणे बाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन...
करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप जळणे, सतत बंद पडणे अशा बाबीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच ८ तासाचा वीज पुरवठा ६ तास व ५ तास केला जात आहे. त्यातही वादळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानामुळे वीज दिवस - दिवस गायब होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच १ जून च्या दरम्यान मतदारसंघांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी, आंबा, सिताफळ, पेरू अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी यासंबंधीची निवेदन मा.आ.संजयमामा शिंदे यांनी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना आज दिले.