केम येथील श्री उत्तरेश्वर महाराजांच्या यात्रेस मंगळवार पासून प्रारंभकरमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
केम येथील श्री उत्तरेश्वर महाराजांच्या यात्रेस मंगळवार पासून प्रारंभ
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर महाराजांच्या यात्रेस मंगळवार पासून प्रारंभ होत आहे सालाबादप्रमाणे यंदाही श्री उत्तरेश्वर महाराजांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे मंगळवारी सकाळी पासुन श्री उत्तरेश्वर महाराजांच्या दरबारात केम नगरी मधील सर्व लहान थोर बाळगोपाळ देवाला शेरणी घेऊन जातात यात्रेच्या दिवशी मंदीरामध्ये श्री उत्तरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी खुप गर्दी पहावयास मिळते मंगळवारी रात्री १२:०० वाजता श्री उत्तरेश्वर महाराजांचा नंदीवर बसुन छबीना गावामध्ये येत असल्याने केम नगरी मधे आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी मलांच्या कुस्त्या पहाण्यासाठी भरपुर प्रमाणामध्ये गर्दी होत असते श्री उत्तरेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी करमाळा माढा तालुक्यासह उपळवटे दहिवली कन्हेरगांव वेणेगांव टेंभुर्णी सातोली वडशिवणे निमगाव बादलेवाडी वडाची वाडी ढवळस भोगेवाडी जाखले चोभेपिंपरी मलवडी साडे सालसे घोटी आशा आनेक गावातून श्री उत्तरेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव पहाण्यासाठी या गावातील नागरिकांनी येत असतात