सावधान"करमाळा तालुक्यात अजुनही बिबट्यांचा वावरं नागरीकांनी सतर्क राहावे - उत्तरेश्वर कांबळे
"सावधान"करमाळा तालुक्यात अजुनही बिबट्यांचा वावरं नागरीकांनी सतर्क राहावे - उत्तरेश्वर कांबळे
करमाळा प्रतिनिधी :करमाळा तालुक्यातील कोर्टी, केम या परिसरात अजुनही बिबट्यांचा वावरं असुन नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमातून केले आहे.
अधिक बोलताना कांबळे म्हणाले की करमाळा तालुक्यातील निंभोरे,देवळाली आदी परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर, शेळी, वासरांवर हल्ला करून ठार केले आहे.हे बिबटे जरी नरभक्षक नसले तरी ही तालुक्यातील शेतकरी ,शेतमजूर नागरीत भितीचे वातावरण निर्माण झाले असुन मागच्या वेळेस नरभक्षक बिबट्याने तालुक्यात हैदोस घातला होता.
त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वनविभागाने तातडीने बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावावेत .
कांबळे म्हणाले की वनविभागाचे आधिकारी श्री.कुरले यांच्याशी चर्चा झाली असुन त्यांच्या म्हणण्यानुसार करमाळा व टेंभुर्णी परिसरात एकुण 4 बिबटे असण्याची दाट शक्यता आहे तरी नागरीकांनी, शेतक-यांनी रात्री -अपरात्री घराबाहेर पडताना स्वतः ची, लहान मुलांची आणी पाळीव प्राण्यांची योग्य ती काळजी घ्यावी. आणी वनविभागाने ज्या बिबट्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
व शेतक-यांना शेतीपंपाचा वीज पुरवठा रात्री ऐवजी दिवसा करण्याचे आवाहन देखील श्री. कांबळे यांनी महावितरण आधिका-यांना केले आहे.