कारखाना सुरू करणे हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहेदशरथ अण्णा कांबळे यांच्या बातमीवर चेअरमन धनंजय डोंगरे
कारखाना सुरू करणे हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहे
दशरथ अण्णा कांबळे यांच्या बातमीवर चेअरमन धनंजय डोंगरे यांची प्रतिक्रिया
करमाळा- श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना परत नव्या जोमाने चालू करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार असल्याची प्रतिक्रिया चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांच्या बातमी संदर्भात बोलताना चेअरमन धनंजय डोंगरे असे म्हणाले की, दशरथ अण्णा कांबळे यांनी ही पाच वर्ष ज्येष्ठ संचालक म्हणून या कारखान्याचे कामकाज पाहिले आहे. त्यांना कारखाना कामकाजाचा अनुभव आहे. ते नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूसाठी लढलेले आहेत. अण्णांनी सुभाष चौकात मला सत्कार करण्याचे निमंत्रण दिले परंतु मी एवढेच सांगतो की, जे काही कारखान्यांने अँडव्हान्स दिलेले आहेत त्या संदर्भातील कारवाई आमच्या वतीने सुरू आहे. आम्ही या संदर्भात कोर्टात दावे दाखल केलेले आहेत. लवकरच कारवाईची प्रक्रिया होईल.
मी कधीच सत्कार व्हावा यासाठी काम केले नाही. उलट कारखाना सहकारी तत्त्वावर राहावा म्हणून दिवस रात्र पळून प्रयत्न केले. आज सर्व ऊसाचे बिले देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहणे हाच आपला सर्वात मोठा सत्कार असल्याचे चेअरमन धनंजय डोंगरे म्हणाले.