ऊस बिले मिळण्यासाठी भव्य रास्ता रोको आंदोलन कुंभेज फाटा येथे करण्यात येणार आहे राजाभाऊ कदम
ऊस बिले मिळण्यासाठी भव्य रास्ता रोको आंदोलन कुंभेज फाटा येथे करण्यात येणार आहे राजाभाऊ कदम दिनांक-10/4/2023 वार सोमवार सकाळी ठिक 10=00वाजता
प्रतिनिधी:करमाळा मकाई साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना विहाळ,कमलाई साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील घागरगाव, साई कृपा हिरडगाव व ईतर कारखान्याकडून नोव्हेंबर महिन्यापासून ऊस बिल दिले नाही ऊस बिल मिळाले पाहिजे व वाहतूक बिले मिळाली पाहिजे म्हणुन बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकरीवर्गाने कुंभेज फाटा येथे भव्य रास्त रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे ऊस बिले मिळाली नसल्यामुळे शेतकरीवर्गावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शेतकरी मेटाकुटीस आला आहे तेंव्हा सर्व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनत सहभागी व्हावे. रास्ता रोको दिनांक 10/4/2023 वार सोमवार सकाळी ठिक-10=00 वाजता कुंभेज फाटा येथे होनार आहे सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आसे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.