मकाई साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर 19 मेला निघणार ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा - राजाभाऊ कदम
मकाई साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर 19 मेला निघणार ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा - राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी :उमरड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती सदर बैठकीमध्ये ऊस बिल थकवलेल्या कारखान्याच्या चेअरमन च्या घरावरती मोर्चा काढण्याचे एकमताने ठरले पहिला मोर्चा मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर 19 मेला काढण्यात येणार आहे .
दुसरा मोर्चा 22 मे ला कमलाई साखर कारखान्याचे चेअरमनच्या घरावरकाढण्यात येणार आहे.
26 मे ला भैरवनाथ विहाळ साखर कारखान्याचे चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
29 मे ला घागरगाव शंकरराव बाजीराव पाटिल साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
31 मे ला साईकृपा साखर कारखाना हिरडगावच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम बैठकीला मार्गदर्शन करताना म्हणाले जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करण्यात येईल साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची बिले लवकरात लवकर काढावीत ऊस गाळपास गेल्यापासून पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे असा नियम असताना कारखानदार शेतकऱ्यांना सहा सहा महिने बिले देत नाहीत
हा शेतकऱ्यांवरती होणारा मोठा अन्याय आहे थकीत ऊसाची बिले व्याजासहित शेतकऱ्यांना मिळावीत आशी आपली मागणी आहे
जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळणार नाहीत तोपर्यंत आपण शेतकऱ्यांसाठी साखर सम्राटाविरुद्ध लढा देत राहणार आहोत यावेळेस प्रशांत वामनराव बदे उमरड, नंदकिशोर वोलटे उमरड, राहुल गोडगे सोगाव, गणेश परदेशी आंजनडोह, यांचीही भाषणे झाली.
मा. सरपंच संदिप मारकड, भीमराव घाडगे झरे, नंदकिशोर वोलटे,
प्रशांत वामनराव बदे, जनार्धन मारकड,हनुमंत रंदवे, सोमा पठाडे,निलेश पडवळे,बाबासाहेब कदम,नवनाथ शेळके,बालाजी पाटील,मंगेश मारकड,बाळू मार्कड,विलास बदे,आबा पाटील,सागर मार्कड,विकास कदम,आदित्य पाटील,नितीन मार्कड,दासा लोखंडे ,बापू बदे, धर्मराज वलटे, कुंडलिक चोरमले, रमेश कदम, ज्ञानेश्वर मार्कड, नारायण कुंडलकर, अशोक भोगील, धनंजय मारकड, भैय्या मार्कड ,आदी शेकडो शेतकरी उपस्थित होते.