आखेर मकाई चे चेअरमन नरमले कारखान्याची ऊस बिले मे अखेरपर्यंत काढण्याचे लेखी पत्र दिले दिनांक 19 मे शुक्रवार चा मोर्चा रद्द करण्यात आला आहे - राजाभाऊ कदम
आखेर मकाई चे चेअरमन नरमले कारखान्याची ऊस बिले मे अखेरपर्यंत काढण्याचे लेखी पत्र दिले दिनांक 19 मे शुक्रवार चा मोर्चा रद्द करण्यात आला आहे - राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी: शेतकऱ्यांची ऊस बिले मिळावीत म्हणून बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय दिनांक 19 मे रोजी घेतला होता परंतु मकाईचे निवडणुकीच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी दिनांक दिनांक 18 रोजी सायंकाळी नऊ वाजता तहसीलदार विजयकुमार जाधव साहेब मकाईचे कार्यकारी संचालक खाटमोडे साहेब बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक लावली व पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी दिग्विजय बागल यांच्याशी ऊस बिलाबाबत चर्चा करून अखेर दिग्विजय बागल यांनी कार्यकारी संचालक खाटमोडे यांच्या मार्फत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना लेखी पत्र दिले ऊस बिले व वाहतूक बिले मे अखेर 2023 पर्यंत देणार असे लेखी आश्वासन दिल्याने 19 तारखेचा शुक्रवारचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी मे अखेर 2023 पर्यंत ऊस बिले व वाहतूक बिले नाही दिल्यास जून महिन्यामध्ये एक तारखेला मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर पुन्हा मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा राजाभाऊ कदम यांनी केली यावेळेस उपस्थित शेतकरी दत्तू आबा गव्हाणे संदीप मारकड निलेश पडवळे बालाजी पाटील आदी उपस्थित होते