डिजीटल बॅन्जोच्या नावाखाली कर्कश आवाजाचे डिजे वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करा: उत्तरेश्वर कांबळे

डिजीटल बॅन्जोच्या नावाखाली  कर्कश आवाजाचे डिजे वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करा: उत्तरेश्वर कांबळे 

करमाळा प्रतिनिधी: सध्या जीवघेण्या डिजेचे स्तोम माजले असुन डिजीटल बॅन्जोच्या नावाखाली राजरोसपणे कर्कश आवाजात डिजे वाजले जात असुन  सोलापूर जिल्ह्यातील अशा डिजीटल बॅन्जोवर कडक कारवाईची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
निवेदन नमूद केले आहे की शहरात, गाव खेड्यात लग्न समारंभ, वरात, जयंत्या, वाढदिवस इत्यादी. कार्यक्रमात न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली करून मोठ्या आवाजात डिजे वाजले जात आहेत. 
प्रसार माध्यमातून या डिजेने अनेकांना बहिरेपणा आला आहे तर काहींचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन देखील झाले आहे.
पारंपारिक वाद्यांला बगल देत तरूणाई डिजेकडे आकर्षित जरी होत असली तरी तो डिजे जीवघेणा आहे.याची कल्पना त्यांनी असली पण ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलीस प्रशासनाने तात्काळ बॅन्जोचे नाव वापरून डिजे वाजवण्या-या लोकांवर कडक कारवाई करायलाच पाहिजे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश