साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी दोन दिवसात शेतकऱ्यांची बैठक बोलवणार - राजाभाऊ कदम
साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी दोन दिवसात शेतकऱ्यांची बैठक बोलवणार - राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी: प्रशीधीस दिलेल्या निवेदणात राजाभाऊ कदम म्हनाले
थकीत उसाची बिले मिळावीत म्हणून बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने दहा एप्रिल रोजी कुंभेज फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते आंदोलनामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता तेव्हा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी मकाई, भैरवनाथ, कमलाई, घागरगाव, हिरडगाव, या कारखान्यांनी 30 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांची उसाची बिले काढावीत आशी मुदत दिली होती.
जर 30 एप्रिल पर्यंत उसाची बिले नाही काढली तर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढणार असा इशारा दिला होता परंतु मकाई, भैरवनाथ, कमलाई, घागरगाव, हिरडगाव या कारखान्यांनी थकीत उसाची बिले शेतकऱ्यांची काढली नाहीत. कारखान्याचे चेअरमन गेंड्याच्या कातडीचे आहेत निर्दयी आहेत शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळतात शेतकऱ्यांच्या प्रपंच्याचे काही घेणे देणे नाही मकाई साखर कारखान्याने नोव्हेंबर महीण्या पासुन ऊसाची बिले थकवली आहेत शेतकऱ्यांनी कसे जगावे चेअरमन ला याचे कसे काय वाटत नसेल
त्यामुळे लवकरच कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढणार आहे या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांची दोन दिवसात बैठक घेऊन पहिल्यांदा कोणत्या साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढायचा हे निश्चित ठरवणार आहे.
क्रमशाहा उसाची बिले थकवलेल्या सर्व साखर कारखान्याच्या चेअरमनच्या घरावरती एका पाठोपाठ वेगवेगळ्या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळेपर्यंत आपला लढा चालूच राहील साखर सम्राटांच्या विरुद्ध आपण रणशिंग फुंकले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मोर्चा यशस्वी करणार व ऊसाची बिले शेतकऱ्यांना मिळवून देणारच