मोर्चाच्या धास्तीने कमलाईचे चेअरमन यांनीही ऊस बिल काढणार असल्याचे दिले लेखी पत्र

मोर्चाच्या धास्तीने कमलाईचे चेअरमन यांनीही ऊस बिल काढणार असल्याचे दिले लेखी पत्र २० जून पर्यंत मिळणार ऊस बिले मोर्चा स्थगित
करमाळा प्रतिनिधी: विठ्ठल रिफाइंड शुगर कमलाई कारखान्याचे चेअरमन यांना पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब यांनी राजाभाऊ कदम बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष हे ऊस बिलासाठी चेअरमनच्या घरावर मोर्चा काढणार आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे आपण तत्काळ  राजाभाऊ कदम व  शेतकऱ्यांशी ऊस बिल काढण्या बाबत विचार विनिमय करावा त्याप्रमाणे कमलाईचे चेअरमन विक्रम शिंदे यांनी कमलाई साखर कारखान्याचे  एमडी क्षीरसागर साहेब, प्रशासकीय अधिकारी जगताप आर पी यांना करमाळा तहसीलदार साहेब यांच्याकडे बैठकीसाठी पाठवले एपीआय जगदाळे साहेब बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांची तहसीलदार विजयकुमार जाधव साहेब यांच्यासमोर दि.२१ रोजी  बैठक होऊन कारखान्याच्या एमडी ने 20 जून पर्यंत उसाची थकीत बिले काढणार असे लेखी पत्र तहसीलदार यांच्या साक्षीने बहुजन संघर्ष सेनेचे  जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना दिले यावेळी संदीप पाटील, निलेश पडवळे , सोमा पठाडे, विशाल मार्कड  शेतकरी उपस्थित होते. 
 कमलाई कारखान्यावर साखर आयुक्त मार्फत  जिल्हा अधिकारी यांनी आर आर सी प्रमाणे कारवाई सुरू केली आहे साखर जप्त करून  साखरेचा निलाव करून तहसीलदार मार्फत साखर कारखान्याच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या उसाची बिले देण्याची प्रोसिजर  सुरू होणार आहे या सर्व प्रक्रियेला 20 जून उजडेल असे तहसीलदार विजयकुमार जाधव साहेब यांनी सांगितले तहसीलदार व कारखान्याचे एमडी यांनी मोर्चा स्थगित करण्याची विनंती केल्याने बावीस 22 मे रोजी कमलाईचे चेअरमन विक्रम शिंदे यांच्या घरावर निघणारा मोर्चा  स्थगित करण्यात आला आहे याची नोंद करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावी बहुजन संघर्ष सेनेचे  जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी सोलापूर  यांच्याकडे शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ताही मिळाला नाही अशी ई-मेल द्वारे तक्रार दाखल केली होती व कुंभेज फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करून साखर आयुक्तांना  कळवले होते याचाच परिणाम म्हणून विठ्ठल रिफाइंड शुगर कमलाई कारखान्यावर आर आर सी अंतर्गत जिल्हा अधिकारी यांनी कारवाई केली आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश