उमरड येथे नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला
उमरड येथे नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला
करमाळा प्रतिनिधी: नुकतेच राधा नगरी येथून बदली होऊन करमाळा येथे आलेले नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांचा उमरड ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला या वेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना नायब तहसीलदार गायकवाड म्हणाले उमरड येथे मी सोळा वर्षे तलाठी म्हणुन काम केले आहे त्यामुळे उमरड मला माहेर असल्या सारखे आहे मला राजाभाऊ कदम व संदीप मारकड यांनी उमरड येथे सत्कार घेण्या साठी बोलावले याचा मला आनन्द झाला व मी तात्काळ येण्यास तयार झालो मी प्रामाणिकपणे तालुक्यातील प्रतेक शेतकर्यांच्या अडचणी सोडवतो मी मोठा माणूस आणि लहान माणूस असा भेद करत नाही मला सर्व मानस समान आहेत तुमच्या महसूल मधील कोणत्याही अडचणी असू ध्या माझ्या कडे या मी तुम्हाला मदत करेल. या वेळी बहुजन संघर्ष सेना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम,पाखरे गुरुजी,नंदकिशोर वलटे यांनी मनोगत व्यक्त केले.
मा.उपसरपंच गणेश चौधरी,जनार्धन तात्या मारकड, काका पाटील, नंदकिशोर चौधरी,बापू बदे,बालाजी पाटील, मुकेश गायकवाड, चंद्रशेखर पाटील,धर्मराज वलटे, आणील वलटे,सोमनाथ पठाडे ,शब्बीर शेख, रामा मरकड, नीलेश पडवळे, छगन वलटे, भाग्यवंत बंडगर, आबा कदम, आबा पाटील, आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते