यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील यांच्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलन* - *नागेशदादा कांबळे*
*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य पाटील यांच्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलन* - *नागेशदादा कांबळे*
करमाळा: येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एल.बी.पाटील यांनी मागासवर्गीय ग्रंथपाल महिलेचा विनयभंग व मानसिक छळ केला असून यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे त्यांनी रितसर तक्रार दाखल केलेली असून अजूनही कार्यवाही झालेली नसल्याने सदरील प्राचार्यांवर विनयभंगाचा गून्हा दाखल करावा अन्यथा आरपीआय च्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असे निवेदन रिपाई (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश दादा कांबळे यांनी दिलेले आहे.
सदरील महिलेस हे प्राचार्य जाणूनबुजून मानसिक त्रास देत असून अश्लील हावभाव,तसेच विनयभंग केलेला असून विद्येच्या या मंदिरात स्वतः प्राचार्यच जर असे दुष्कृत्य करीत असतील तर हे शैक्षणिक मंदिराचे अधःपतन असून हि गंभीर बाब आहे.असे असेल तर पालक आपल्या मुलींना या संस्थेत शिक्षणासाठी लावण्यापूर्वी विचार करतील.
असले शिक्षणक्षेत्राला कलंकित करणारे तसेच मागासवर्गीय उच्चशिक्षित महिलेवर होणारे अत्याचार हे कधीच सहन केले जाणार नाहीत त्याविरुद्ध जनमताचा आवाज उठलाच पाहिजे असे असताना संस्थेने चौकशीचा फार्स केला आहे .या संस्थेत 9/10 वर्षापूर्वी देखील अशीच तक्रार आली होती तेव्हा मात्र असा फार्स केला नव्हता असे देखील निवेदनात म्हटले आहे.या निवेदनासोबत या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जोडली आहेत.