महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विकृत होत आहे कि, विकृत मानसिकतेचे लोकप्रतिनिधी तयार होत आहेत?- दशरथआण्णा कांबळे
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विकृत होत आहे कि, विकृत मानसिकतेचे लोकप्रतिनिधी तयार होत आहेत?- दशरथआण्णा कांबळे
करमाळा-प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासुन महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत रसातळाला गेलेले संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्याचमुळे आता आम्हाला असा प्रश्न पडतो कि, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विकृत होत आहे कि, विकृत मानसिकतेचे लोकप्रतिनिधी तयार होत आहेत? कारण गेल्या काही महिन्यांपुर्वी सत्तेसाठी कशाप्रकारे राजकिय सारीपाठ खेळला गेला हे सर्व जगाने आणि जाणकार व्यक्तीनी अनुभवले आणि पाहिले. या सर्व राजकारणात एकमेकांवर मोठ्या प्रमाणात राजकीय चिखलफेक झाली. प्रत्येकाचे उत्तरास प्रतिउत्तर लगेच तयार होते. राजकिय महिलांवर टिका करत असताना, अत्यंत खालच्या भाषेत संविधानात्मक पदावर विराजमान असणाऱ्या मंत्रीमहोदयानी टिका करणे. हे सर्वच महाराष्ट्राच्या राजकारणाला कदापि हि शोभणारे नव्हते. कारण याआधी सुध्दा महाराष्ट्रात चळवळीच्या माध्यमातुन राजकारणात अनेक राजकिय धुरंधर होऊन गेले. परंतु सध्या राजकारणाचा जो दर्जा खालावला गेला आहे. तेवढा भुतकाळामध्येच कधीच घसरला नसेल.
प्रत्येक राजकिय व्यक्तीला, पक्षाला आणि विशिष्ठ समाजाला एक वैचारिक अधिष्ठान असते. आणि या वैचारिक अधिष्ठानातुन एक नवं नेतृत्व जन्माला येत असते. आणि गोपीचंद पडळकर आपण सुध्दा बहुजन समाजातील आहात. परंतु राजकिय लालसेपोटी आपण आपली वैचारिक पातळी सोडून नेमकी वाटचाल कोणत्या दिशेला सुरु केली आहे. मनुवादी विचारांचा एवढा मोठा पगडा, एखाद्या पक्षाकडून आमदारकी आणि खासदारकी मिळावी. म्हणुन कुणीतरी भुक म्हटले म्हणुन उठसुठ शरद पवार यांच्यावर आपली पातळी सोडून आणि पात्रतेच्या बाहेर जाऊन, ज्या टिकांना काही अर्थ नाही. तथ्यहिन व आधार नसलेल्या त्या सुध्दा स्वतःचे मानसिक संतुलन ढासळल्याप्रमाणे टिका करत सुटणे. हे कोणत्या ही राजकारण्याला शोभणारे नाही. याचाच आ. पडळकर यांना कदाचित विसर पडलेला असावा. कारण शरद पवार यांच्यावर आपण एकेरी भाषेत टिका करता. याविषयी मला फक्त एवढेच वाटते कि, तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य जरुर आहे. परंतु शरद पवार यांनी सुध्दा बहुजन समाजासाठी अनेक वर्षे काम केले आहे आणि ते करत आहेत. परंतु बहुजन समाजातील नेतृत्व म्हणुन आज हि आमच्या सारखे अनेकजण तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतात. आपले मस्तक कुणाचे हस्तक असु नये. त्याउलट महापुरुषांची नावे घेऊन तुम्ही, मनुवाद्यांच्या एखाद्या पदाच्या लालसेपोटी विचारांची पार राखरांगोळी केली आहे. कारण समाजापुढे पवारांपेक्षा सुध्दा अनेक महत्वाचे प्रश्न पडले आहेत. समाजाला आरक्षण मिळविणे, 'धनगर आणि धनगड' या शब्दामध्ये कित्येक वर्षे झाले समाज गुरफटून पडला आहे, अद्यापपर्यंत जातीनिहाय जनगणना झालेली नाही. अशा एक ना अनेक समस्या समाजापुढे 'आ' वासून उभ्या आहेत. त्याकडे सुध्दा आपण जरा लक्ष दिले. तर नक्कीच या समाजाला भेडसावत असणाऱ्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल. आ. पडळकर यांनी स्वाभिमान गहाण ठेऊन कुणाच्या तरी इशाऱ्यावर उड्या मारणारे माकड होऊ नये.
आपण एक विधानपरिषदेचे आमदार आहात. आणि पवारांपेक्षा सुध्दा समाजाला भेडसावणारे जे मोठे प्रश्न आहेत. ते सोडवून आपण एक आदर्श निर्माण करावा. कारण पवारांनी समाजाचे कसे नुकसान केले आहे? हे समाजाला पटवून सांगण्यापेक्षा तुम्ही समाजासाठी काय केले? आणि काय करणार आहात? याचे सुध्दा कधीतरी विश्लेषण करत जावा. तुमची कर्तृत्व शुन्यता झाकण्यासाठी आवाक्याच्या बाहेर जाऊन, उगाच प्रयत्न करुन प्रत्येकवेळी तोंडावर पडता. तुमच्या क्रियेवर साधी पवार घराण्यातील एक तरी व्यक्ति प्रतिक्रिया देते का? तुम्हाला प्रतिक्रिया न देणे म्हणजेच, तुमच्यासारख्या मनूवादी विचाराधारेच्या माणसाला प्रतिक्रिया देण्या इतपत सुध्दा तुम्हाला ते लायक समजत नाहीत. कारण सुर्यावर किती ही थुंकले तरी ती थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर येऊन पडते. तुम्ही ज्या ठिकाणी जाता, त्या लोकांचा चेहरा किंवा प्रतिनिधी म्हणुन जाता. त्यावेळेस तुमच्या विचारांचे प्रतिबिंब नक्कीच तुमच्या समोर असलेल्या जनमाणसात दिसुन येत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांचे अधिष्ठान मांडत असताना, जनमाणसात तुम्ही कोणता विचार पेरत आहात, याचा सुध्दा थोड्याफार प्रमाणात विचार करावा.