ओम राजे कृषी उद्योग समूहाचे उद्घाटन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते संपण झाले

ओम राजे कृषी उद्योग समूहाचे उद्घाटन  माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते संपण  झाले
करमाळा प्रतिनिधी : उमरड येथे संदीप बाजीराव मरकड पाटील यांनी ओमराजे  कृषी उद्योग समूह नावाने खते बी बियाणे औषधे शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे ओमराजे कृषी उद्योग समूहाचे उद्घाटन माजी आमदार नारायण आबा पाटील व श्री महानवर महाराज पापनास यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळेस नारायण आबा पाटील यांनी विचार व्यक्त करताना ओम राजे कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून उमरड गावाच्या विकासामध्ये भर पडली आहे असे उद् गार  काढले उमरड गावामध्ये अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने चांगलीच प्रगती झालेली आहे.
 यावेळेस पुढे बोलताना नारायण आबा पाटील म्हणाले सध्या उजनी धरणाचे पाणी खाली सोडल्या मुळे  शेतकऱ्यांचे पाण्यासाठी हाल सुरू झालेले आहेत मात्र याच्याकडे करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत शेतकऱ्यांनो तुम्ही करमाळा तालुक्याचा लोकप्रतिनिधी चुकीचा निवडून दिल्यामुळे आज हे दिवस आपल्याला पाहावे लागले आहेत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणी वाली उरला नाही उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे आज उजनीचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खाली गेले आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यांची ऊसाची पिके केळीची पिके जळू लागले आहेत हे सर्व का घडत आहे करमाळा विधानसभेचा लोकप्रतिनिधी चुकीचा निवडून दिल्यामुळे घडत आहे.
आपण कुंभेज फाटा ते रामवाडी रस्ता मंजूर करून आत्ता त्या  रस्त्याचे काम पूर्ण होत आहे यामुळे उमरड गावाचे दळणवळण वाढले असून विकासामध्ये मोठी भर पडली आहे यावेळेस नारायण आबा पाटील यांनी संदीप बाजीराव मारकड व बापू बाजीराव मारकड यांचे कौतुक केले व नवीन उद्योग सुरू केल्याचे समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या
या वेळेस राजाभाऊ कदम यांनीआपल्या भाषणातून, उमरड ते झरे, उमरड ते अंजनडोह, उमरड ते विहाळ, उमरड ते केडगाव ,उमरडते पूर्व सोगाव,  उमरड ते पोंधवडी या उमरड ला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री सडक योजनेत बसवून मंजुर करावीत अशी मागणी केली यामुळे उमरड गावचे दळणवळण वाढेल व गावातील व्यवसायांना चांगले दिवस निर्माण होतील . ओमराजे कृषी उद्योग समूहाला शुभेच्छा दिल्या
या वेळेस  श्री महानवर महाराज, प्रगतशील बागायतदार धुळाभाउ कोकरे,माजी सभापती अतुल भाऊ पाटील, श्रीमान चौधरी, पोफळज चे सरपंच कल्याण पवार, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम,मा. उपसरपंच गणेश चोधरी,मा. सरपंच दादा मरकड, अंजनडोह चे सरपंच अरुण शेळके, डॉक्टर शेळके,D.G बदे, बापू बदे, तात्या सरडे, भीमराव घाडगे, शिवा घाडगे,बारामती ऍग्रो चे घाडगे साहेब , मा. सरपंच प्रमोद बदे, धर्मांअना चौधरी, अनिल बंडगर महाराष्ट्र ऍग्रो चे मांजरे साहेब मकाइचे संचालक बापू चोरमले, उमेश काका इंगळे, संपत सेठ राठोड, विजय गोडगे, हुसेन मुलानी वस्ताद, दिनू कोंडलकर, पप्पू पालवे, परवेज शेख, प्रतीक सरडे, कृषी अधिकारी मधुकर मारकड, अण्णा नाईकवडे तुकाराम चोरगे नितीन पालवे आदी शेकडो शेतकरी उपस्तीत  होते .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश