महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जिंती गावचा झाला पहिला फौजदार**करमाळा:-अक्षय वरकड*

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जिंती गावचा झाला पहिला फौजदार*
*करमाळा:-अक्षय वरकड*
    ‌ करमाळा तालुक्यातील जिंती येथे आज दिनांक ४जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जिंती गावचे सुपुत्र कु.ओंकार दत्तात्रय धेंडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
      ओंकार धेंडे यांचा शैक्षणिक प्रवास जिंती, पुणे व करमाळा येथे झाला. परिस्थितीची झुंज देऊन व अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्याने आज त्यांना यश संपादन झाले आहे. कु.ओंकार धेंडे हे करमाळा येथे लोकसेवा आयोगाचे परीक्षा देत होते व करमाळा येथेच ते निवासी राहत होते व फौजदार या पदाचा सातत्याने अभ्यास करत होते. त्यांचं असं मत आहे की मी एकच धेय ठेवलं होतं की मला फक्त पीएसआय व्हायचं आहे अनेक परीक्षा त्यांनी फेटाळल्या पण त्यांचं एकच धेय होते ते म्हणजे पीएसआय होण्याचं आणि त्यांनी ते आज पूर्ण केलं आहे अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
       त्यांच्या वडिलांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की माझी परिस्थिती हालाखीची असताना मी माझ्या मुलाला कामाला लावला नाही. त्याला फक्त मी एक म्हणलो की मला फक्त तू सरकारी नोकरीत झाला पाहिजे असं ते म्हणले. त्यांनी ओंकार दादाचं शिक्षण थांबवलं नाही व कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक वस्तू असतील  करमाळा येथे राहण्यासाठी वस्तीग्रहासाठी, जेवणासाठी, अभ्यास करण्यासाठी जे काय लागेल ते त्यांनी पुरवलं त्यांना माहीत होते की माझा मुलगा एक ना एक दिवस सरकारी नोकरीला लागणार हे त्यांना माहिती होतं ते स्वप्न त्यांचं आज पूर्ण झालं आहे. अशीच दत्तात्रय धेंडे काकांची प्रेरणा घेऊन समाजातील लोकांनी आपल्या मुलांना चांगलं प्रतिचे शिक्षण दिले पाहिजे कात्रज गावचे सुपुत्र कु.तात्यासाहेब धायगुडे सर व पत्रकार श्री.अक्षय वरकड यांनी पीएसआय ओंकार दत्तात्रय धेंडे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन यथोचित त्यांचा व त्यांच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला. व जिंती गावातील ग्रामस्थांनी सुद्धा पीएसआय ओंकार धेंडे यांचा सत्कार केला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश