ऊस बिल मिळण्यासाठी शेतकऱ्यांची शुक्रवारी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे बैठक शेतकऱ्यांनी उपस्तीत राहवे
ऊस बिल मिळण्यासाठी शेतकऱ्यांची शुक्रवारी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे बैठक शेतकऱ्यांनी उपस्तीत राहवे
करमाळा प्रतिनिधी : मकाई, कमलाई, घागरगाव साखर कारखान्यांनी उसाची बिले थकवलेली आहेत बिले मिळण्यासाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे दि. ११/८/२०२३ शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे सदर बैठकीमध्ये ऊस बिल थकलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करण्यात येणार आहे व सदर यादी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे त्यामुळे उस बिल न मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांनी करमाळा येथे कोर्टाच्या शेजारी शासकीय विश्रामगृह करमाळा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या नावाची नोंद करावी
बैठकीला मार्गदर्शन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष रजाभाऊ कदम करणार आहेत व सर्वांच्या विचाराने पुढील दिशा ठरवली जाणार आहे
दि.११/८/२०२३ शुक्रवारी सकाळी ठीक - ११:०० वाजता नाव नोंदणी व बैठकीला सुरुवात होईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व बैठकीला वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान
लालासाहेब काळे, सुंदरदास काळे,दात्ता गव्हाणे, राजकुमार देशमुख, संदीप मारकड पाटील, निलेश पडवळे यांनी केले आहे