झरे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रहार संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा
झरे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रहार संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा.
झरे गावामध्ये मंजूर असलेल्या विविध योजना आणि त्यातून पूर्णत्वास आलेली कामे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. गावामध्ये झालेल्या कामातील भ्रष्टाचाराबाबत आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून सतत झरे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री. कळसाईत यांच्या निदर्शनास कामातील भ्रष्टाचार आणून दिलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत त्यांनी संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे गावातील तरुणांसाठी शासनाचे गावामध्ये सर्व सोयी सुविधा युक्त प्रशस्त अशी व्यायाम शाळा आहे ती सुद्धा एका शिक्षण संस्था चालकाच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक वाचनालय सुद्धा सदैव बंद अवस्थेत असते गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने लाखो रुपयांची पानंद रस्त्याची कामे मंजूर झालेले आहेत. परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती कामे अपूर्ण स्वरूपात केलेली आहेत व त्या कामांचे कोणत्याही प्रकारचे चौकशी न करता करमाळा बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने अपूर्ण कामांची लाखो रुपयांची बिले काढलेले आहेत. त्याचप्रमाणे गावातील जल जीवन मिशन योजनेमध्ये सुद्धा संबंधित ठेकेदार मनमानी रित्या चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे संबंधित कामाची सुद्धा योग्य चौकशी करण्यात यावी अशा प्रकारे या सर्व प्रकरणांमध्ये ठेकेदार अधिकारी व संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे.
अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने बुधवार दि.13 सप्टेंबर रोजी पंचायत समिती करमाळा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन पत्र देण्यात आले.
यावेळी प्रहार ता.अध्यक्ष संदीप तळेकर,
प्रहार ता.उपाध्यक्ष सोमनाथ जाधव,प्रहार ता.संघटक नामदेव पालवे,झरे ग्रा.सदस्य प्रशांत चौधरी,झरे ग्रा.सदस्य प्रकाश कोकाटे,वि.का.सो सदस्य कल्याण कोठावळे,युवा सेना ता.अध्यक्ष राहुल कानगुडे, छत्रपती शासनचे दादा तनपुरे, विशाल पाटील, सुधीर आवटे इत्यादी जण उपस्थित होते.