दशरथआण्णा कांबळे आणि राष्ट्रवादीमध्ये तब्बल दोन तास चर्चा, तालुक्यात राजकिय उलथा-पालथ होणार?
दशरथआण्णा कांबळे आणि राष्ट्रवादीमध्ये तब्बल दोन तास चर्चा, तालुक्यात राजकिय उलथा-पालथ होणार?
प्रतिनिधि हर्षवर्धन गाडे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांच्याशी, करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय विषयावर तब्बल दोन तास चर्चा केली. या चर्चे दरम्यान करमाळा तालुक्यामध्ये (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेससाठी सध्या कशा प्रकारचे वातावरण आहे? त्याचप्रमाणे येणाऱ्या आगामी सर्वच निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर भक्कम असे कोणते नियोजन करता येईल का? याचा आढावा यावेळी कांबळे यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव सरडे, करमाळा ता. सरचिटणीस समाधान शिंगटे त्याचप्रमाणे इतर हि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
करमाळा शहर आणि तालुका येथे राष्ट्रवादीच्या वाढविस्तारासाठी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेता येतील? पदाधिकाऱ्यांमधील मतभेद, नाराजी किंवा एकमेंकाविषयी असलेले गैरसमज मिटवून, करमाळा मतदार संघात (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार व लोकसभेसाठी खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. अशाप्रकारच्या सुचना यावेळेस जगताप यांनी दिल्या. याचवेळी अभयसिंह जगताप व इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यानी, दशरथआण्णा कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन, याठिकाणच्या सर्वच पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शकाची भुमिका अदा करावी. त्याचप्रमाणे कांबळे जर राष्ट्रवादीमध्ये येत असतील तर त्यांचे आम्ही जंगी स्वागत करु. कारण कांबळे यांच्यासारख्या परखड व्यक्तीमत्वाची सध्या महाराष्ट्रात व करमाळा तालुक्यात मोठी गरज आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर भाजपा दररोज संविधान विरोधी कृत्य करत आहे. महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, शिक्षणाचे बाजारीकरण अशा अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या सर्वच समविचारी संघटनांनी एकत्र येऊन या सर्व संकटांना सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे कांबळे हे सुध्दा महापुरुषांच्या विचारांचे वारसदार म्हणून प्रत्येक वेळेस त्यांची ओळख सांगतात. आणि ह्याच महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांच्या अनुषंगाने "आण्णा" यांनी (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. अशाप्रकारचा आशावाद यावेळी अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला. राज्यामध्ये सध्या राजकिय उलथा-पालथ झाल्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये कांबळे यांच्या येण्याने राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात निर्माण झालेली पोकळी भरुन निघण्यास मदत होईल. त्यामुळे आम्ही वरिष्ठ पातळीवर दशरथआण्णा कांबळे यांच्या नावाविषयी कल्पना देणार असल्याचे अभयसिंह जगताप यांनी सांगितले.
कांबळे यांची करमाळा तालुक्यातील राजकारणावर असलेली पकड.... आणि राष्ट्रवादीसाठी ते आता का महत्वाचे ठरतात?
दशरथआण्णा कांबळे यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध राजकिय, सामाजिक आंदोलने केली आहेत. त्यांना तालुक्यातील राजकारणातील खाचखळगे बऱ्यापैकी माहित आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये कोठे ही सभा असेल, तर परखडपणे बोलणारे व्यक्तीमत्व आणि ऐनवेळेस शेतकऱ्यांच्या मतांद्वारे कलाटणी देण्याची क्षमता कांबळे यांच्याकडे आहे. सध्या करमाळा तालुक्यामध्ये (शरद पवार) राष्ट्रवादीसाठी परखड बोलणारा कोणता ही वक्ता किंवा नेता नसल्यामुळे, कांबळे हे राष्ट्रवादीसाठी करमाळा तालुक्यात नवसंजीवनी ठरु शकतात. कारण मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या पाठोपाठ परखडपणे भूमिका मांडणारे व्यक्तीमत्व म्हणून कांबळे यांच्याकडेच पाहिले जाते. तालुक्यातील विविध संघटना, पक्ष यांना हक्काने, अधिकाराने बोलत सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे, याठिकाणच्या राजकारणामध्ये कांबळे यांची लक्षवेधक भूमिका राहणार यात काही शंका नाही.
मी अद्याप माझी कोणती ही भुमिका स्पष्ट केलेली नाही, दशरथआण्णा कांबळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी, दि. 15 ऑक्टोबर रोजी माझ्याशी तब्बल दोन तास राजकीय, सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा केली. यादरम्यान जगताप यांनी मला "(शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा आम्ही आपले जंगी स्वागत करू" अशाप्रकारे ही सांगितले आहे. परंतु अद्याप पर्यंत मी माझी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. आज पर्यंत मी महापुरुषांच्या विचारांशी बांधिल राहून स्वतंत्रपणे काम केलेले आहे. त्यामुळे भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या विचारांशी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतारणा होणार नाही याची मी प्रत्येकवेळी दक्षता घेतो. त्यामुळे बहुजन महापुरुषांच्या व भारतीय संविधानाशी बांधील असणाऱ्या पक्षाचा मी येणाऱ्या काळात अवश्य विचार करेन.