थकीत उसाची बिले मकाई कारखाना देणार की बुडविणार?- राजाभाऊ कदम
थकीत उसाची बिले मकाई कारखाना देणार की बुडविणार?- राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी : 2022- 23 गळीत हंगामातील उसाची बिले अद्याप पर्यंत मिळाली नाहीत उसाची बिले मिळावीत म्हणून हजारो लोकांना घेऊन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी रस्ता रोको केला मोर्चे काढले आंदोलनाच्या धास्तीने हिरडगाव, घागरगाव, कमलाई, भैरवनाथ, या कारखान्यांनी आंदोलनाच्या धास्तीने उसाची बिले काढली परंतु मकाई कारखान्याने लेखी व तोंडी खोटी आश्वासने दिली मात्र अद्याप पर्यंत उसाची बिले दिली नाहीत
कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर हे बातमी देतात की लवकरच उसाची बिले मिळतील या बातमीवर शेतकऱ्यांचा काडी मात्र विश्वास नाही कारण आत्तापर्यंत दिलेली आश्वासने तत्कालीन कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी पाळी नाहीत तर बागल कुटुंबांनी शेतकऱ्यांची चेष्टा चालवलेली आहे त्यामुळे लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही अशी धारणा शेतकऱ्यांची झालेली आहे थकीत उसाची बिले माकाई कारखाना देणारकी बुडविणार ? असा खडा सावल राजाभाऊ कदम यांनी विचारला. प्राध्यापक राजेश गायकवाड हे उसाच्या बिलासाठी संगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी बहुजन संघर्षणेचे संस्थापकापक अध्यक्ष राजाभाऊ कदम उपस्थित होते त्यावेळेस राजाभाऊ कदम यांनी विचार व्यक्त केले व प्राध्यापक राजेश गायकवाड यांच्या उपोषणाला बहुजन संघर्ष सेनेने जाहीर पाठिंबा दिला या वेळेस उपस्तीत संदीप मारकड होते