जिल्हा अधिकारी यंच्या दालनात माकाई ऊस बिला संदर्भात बैठक घेण्यात आली
जिल्हा अधिकारी यंच्या दालनात माकाई ऊस बिला संदर्भात बैठक घेण्यात आली
प्रतिनिधी करमाळा : हर्षवर्धन गाडे
आठ डिसेंबर रोजी जिल्हा अधिकारी यांनी मकाई कारखान्याच्या बिलाच्या संदर्भात आता पर्यंत आंदोलन केलेल्या संघटनाचे प्रतिनिधी कारखान्याचे कार्यकारी संचालक तहसीलदार जाधव साहेब यांची बैठक घेतली. बैठकीस राजाभाऊ कदम बहुजन संघर्ष सेना अध्यक्ष उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेब यांनी सांगितले आहे की मकाई कारखान्याने आम्हाला कळविले आहे 25 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्याची बिले देणार आहोत जर 25 डिसेंबर पर्यंत बिले दिले नाहीत पुढे आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू यावेळेस राजाभाऊ कदम यांनी जिल्हा अधिकारी यांना सांगितले आम्ही वेळोवेळी रस्ता रोको आंदोलने केले मोर्चे काढले त्या त्या वेळेस आम्हाला लेखी आश्वासने देऊन बिले दिली नाहीत मग आम्ही आत्ता कसा विश्वास ठेवायचा यावर जिल्हाधिकारी म्हणाले 25 तारखेला बिले दिली नाहीत तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू राजाभाऊ कदम यांनी विचारले काय कारवाई करणार त्यावेळेस त्यांनी सांगितले कारखान्याच्या मालमत्तेवरती बोजा चढविणार त्यावेळेस राजाभाऊ कदम म्हणाले कारखान्याची मालमत्ता ही शेतकरी सभासदांची आहे त्यामुळे कारखान्यावरती बोजा चढवू नये बोजा चढवायचा असेल तर तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल व संचालक मंडळं यांच्या खाजगी प्रॉपर्टी वरती बोजा चढवा यावेळी जिल्हाधिकारी साहेब म्हणाले खाजगी प्रॉपर्टी वरती बोजा चढवण्याची कायद्यात तरतूद नाही त्यामुळे मी बोजा चढवला तरी कोर्ट मान्य करणार नाही यावेळी बैठकीस कारखान्याचे कार्यकारी संचालक खाटमोडे व दिग्विजय बागल उपस्थित नव्हते जिल्हाधिकारी साहेबांनी संतापाप व्यक्त केला ताबडतोब खाटमोडे यांना फोन लावला व सोमवारी दिग्विजय बागल व खाटमोडे यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
राजाभाऊ कदम यांनीकरमाळा तालुक्याला तहसीलदार मिळावा म्हणून आंदोलन केले होते मात्र अद्याप पर्यंत करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाला नाहीअशी विचारणा जिल्हाधिकारी यांना केली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले मी राज्याचे मुख्य सचिव यांना कळविले आहे लवकरच करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळतील या वेळेस उपस्थित प्रभारी तहसीलदार जाधव साहेब, मकाई चे चेअरमन दिनेश भांडवलकर,आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे,संदीप मारकड, चंद्रशेखर पाटील, शंकर कोंडलकर आदी शेतकरी उपस्तीत होते.