प्रहारच्या माध्यमातून पाथुर्डी येथील दोन महिन्याच्या बाळाला मिळाले जीवदान.
प्रहारच्या माध्यमातून पाथुर्डी येथील दोन महिन्याच्या बाळाला मिळाले जीवदान.
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी गावातील आजिनाथ पोपट मोठे यांचे दोन महिन्याच्या बाळाला जन्मापासून हृदयाला होल आहे असे निदान झाले पाथुर्डी चे प्रहार चे कार्यकर्ते समाधान मोठे यांनी करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार यांच्याशी संपर्क साधून संबंधित बाळा विषयी माहिती दिली लगेच सागर भाऊ पवार यांनी त्यांचे पुण्याचे मित्र रुग्णसेवक प्रमोद जाधव, चिरायु हॉस्पिटलचे सादिक शेख व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्याशी संपर्क साधला सर्वांनी मिळून या बाळाला तात्काळ स्वरूपात मदत करण्याचे ठरवले नंतर त्या बाळाला पंढरपूर येथील डॉक्टर निरज शहा यांच्या हॉस्पिटल ला ऍडमिट करण्यात आले आणि डॉक्टरांनी सुद्धा माणुसकी दाखवत संबंधित बाळावर मोफत उपचार करत या बाळाला जीवदान दिले पाथुर्डी गावातील नागरिकातून या बाळाला मिळालेल्या जीवदान याबद्दल आनंद व्यक्त होत असून प्रहार टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सोलापूर जिल्ह्यात अशी हृदयाला होल असणारे बाळ कुणाला आढळली तर प्रहार शी संपर्क साधा असे तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार यांनी सांगितले.