मकाई कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी बँक लोण प्रोसेस चालू जिल्हा अधिकाऱ्यांचे लेखी पत्र जिल्हा अधिकाऱ्यांच्या पत्राचा मान राखूनआंदोलन न करण्याचा निर्णय घेतला - राजाभाऊ कदम

मकाई कारखान्याचे  थकीत ऊस बिल मिळण्यासाठी बँक लोण प्रोसेस चालू जिल्हा अधिकाऱ्यांचे लेखी पत्र जिल्हा अधिकाऱ्यांच्या पत्राचा मान राखूनआंदोलन न करण्याचा निर्णय  घेतला - राजाभाऊ कदम बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष

करमाळा प्रतिनिधी : हर्षवर्धन गाडे

मकाई कारखान्याचे 2022 - 23 मधील थकीत एफ आर पी ऊस बिल आज तागायत शेतकऱ्यांना मिळालेले नाही ऊस बिल मिळावे म्हणून वेळोवेळी रस्ता रोको, मोर्चे आंदोलने बहुजन संघर्ष सेनेने केली मात्र ऊस बिल शेतकऱ्यांना मिळाले नाहीअनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठकी झाल्या परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही भविष्यात शेतकऱ्यांना घेऊन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम तीव्र स्वरूपाचे  आंदोलन करणार असल्याची माहिती प्रशासनाला समजल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या सहीचे पत्र बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना दिले सदर पत्रा मध्ये सुचित केले आहे श्री माकाई सहकारी साखर कारखान्याची बँक लोन मिळण्याची प्रोसेस  चालू असल्याने आपण आंदोलन करू नये जेणेकरून बँक लोन मंजुरीस बाधा निर्माण होईल असे जिल्हा अधिकारी यांनी कळविल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले पाहिजे हीच बहुजन संघर्ष सेनेची प्रमुख भूमिका आहे जर मकाई कारखान्याला बँक लोन मंजूर होऊन शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळणार असेल तरआंदोलन न केलेले चांगले अशी भूमिका राजाभाऊ कदम यांनी घेतली आंदोलन करून कोणाचा राजकीय सूड आपल्याला उगवायचा नाही, किंवा ऊस बिल मिळाल्याचे श्रेय घेण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचे नाही,किंवा ऊस बिलामध्ये आपल्याला राजकारण करायचे नाही तर आपला प्रमुख हेतू शेतकऱ्यांना ऊस बिल मिळाले पाहिजे हाच आहे दस्तूर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून आपल्याला कळवले आहे  मकाई कारखान्याला बँक लोन मंजूर होण्यासाठी प्रोसेस सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा मान राखून आपण आंदोलन न करण्याचा निर्णय घेतलेला असून करमाळा तहसीलदार मार्फत आपण जिल्हाधिकारी यांना आंदोलन करणार नसलेबाबत कळविले आहे मात्र मार्च महिन्यापर्यंत जर उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नाहीत तर मार्च महिन्यामध्ये आंदोलनाचे हत्यार उपासणार असेही राजाभाऊ कदम यांनी पत्रामध्ये लिहिले आहे
यावेळेस बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, लालासाहेब पाटील पंचायत समिती मा. सदस्य,अविनाश मोरे खातगाव सरपंच,प्रवीण ओव्हाळ,देविदास वाघ,संभाजी डावले, मच्छिंद्र काळे,कालिदास कांबळे,सिव्हिल इंजिनियर कोकरे साहेब,आल्हाट,सय्यद,सुयोग मारकड,सुनिल पडवले आधी शेतकरी उपस्थित होते

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश