करमाळ्याचा कायम चार्ज मिळल्यामुळे बहुजन संघर्ष सेनेने केला तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचा सत्कार

करमाळ्याचा कायम चार्ज मिळल्यामुळे बहुजन संघर्ष सेनेने केला  तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचा सत्कार


करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्याला आठ महिन्यापासून अधिकृत तहसीलदार नव्हते  करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाले पाहिजेत म्हणून बहुजन संघर्ष सेनेने आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन केले होते. याची दखल घेऊन सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्काळ करमाळ्यासाठी शिल्पा ठोकडे मॅडम यांची तहसीलदार पदी ऑर्डर काढली होती. मात्र तालुक्यामध्ये तहसीलदार मॅडम लवकरच बदलून जातील अशी चर्चा चालू होती.
 वरिष्ठांनी मात्र तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना करमाळ्याच्या कायमस्वरूपी तहसीलदार म्हणून ऑर्डर दिली.
 बहुजन संघर्ष सेनेला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना कायम ऑर्डर मिळाल्यामुळे आनंद झाला 
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आदरणीय तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचा पुन्हा एकदा सत्कार करून पुढील उत्कृष्ट कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या तहसीलदार शिल्पा ठोकडे करमाळ्याला आल्यापासून तहसील कचेरीतील सर्व कर्मचारी सुता सारखे सरळ झाले असून नागरिकांना व्यवस्थित सहकार्य करू लागले आहेत तहसीलदार मॅडम सर्व कर्मचाऱ्यांवरती स्वतः लक्ष ठेवून असल्याने कामाला गती आली आहे आशा कर्तव्यदक्ष तहसीलदाराची करमाळ्याला गरज होती असे मत बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी व्यक्त केले
या वेळेस राजाभाऊ कदम यांच्या समवेत बळीराम रोंगे, मचिन्द्र काळे, नावनाथ केवारे उपस्थीत होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश