खासदार रणजितदादा निंबाळकर यांचे उपस्थितीत पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीचे जल्लोषात स्वागत

खासदार रणजितदादा निंबाळकर यांचे उपस्थितीत पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीचे जल्लोषात स्वागत

करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे

 रेल्वे च्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाले बद्दल गुरुवार दिनांक-१४/०३/२४ रोजी गाडीचे स्वागत समारंभ व हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. एक्सप्रेस गाडीच्या थांब्या साठी केत्तुर व परिसरातील गोयेगाव, वाशिंबे, राजुरी, सोगाव, हिंगणी, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, भगतवाडी- गुलमरवाडी, देलवडी, कुंभारगाव, दिवेगव्हाण, सावडी, टाकळी, रामवाडी या गावांसह अन्य गावांनी लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता तसेच रेल रोको चे आंदोलन छेडले होते. परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील रेल्वे प्रवाशांना आचार संहितेपूर्वी एक्सप्रेस गाडीला थांबा देण्याचे अभिवचन दिल्याने रेल रोको आंदोलना सह नागरिकांनी बहिष्कार मागे घेतला. मान. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चेन्नई सुपर मेल पारेवाडी रेल्वे स्टेशन वर थांबावी या करीता प्रयत्न केले असुन तत्पुर्वी पुणे ते हरंगुळ/ लातुर या एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळवत प्रवासी बांधवांना दिलेला शब्द पुर्ण केला आहे. याबद्दल केत्तुर आणि परिसरातील ग्रामपंचायतीचे वतीने खासदार निंबाळकर यांचे उपस्थितीत केत्तुर ग्रामपंचायात कार्यालय ते पारेवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत जल्लोषात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी खासदार निंबाळकर यांनी ग्रामस्थ नागरिक यांचेशी संवाद साधत रेल्वे सह अन्य अडी अडचणी समजुन घेतल्या व त्यावर नेस पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पारेवाडी सह रामवाडी, जिंती, भगतवाडी, गुलमरवाडी बोगदयातील निकृष्ट कामे तसेच इतर मागण्या समजुन घेत रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी ड्रेनेज चे काम चांगले करून रेल्वेने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये बाबत सुचित केले असुन, पारेवाडी रेल्वे स्टेशनवर सर्व सोई सुविधा निर्माण करणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामस्थ सर्जेराव राऊत यांनी मालधक्का आणि रेल्वे क्रासिंग करीता नागरिकांसाठी स्वतंत्र दादरा ची मागणी केली असुन, त्याची देखिल पुर्तता करणेचे सुचना रेल्वे विभागाला दिल्या आहेत. या प्रसंगी हरंगुळ/ लातुर ते पुणे एक्सप्रेस गाडीचे पुजन करून गाडीला उपस्थित मान्यवरांचे  हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या प्रसंगी ॲड. अजित विघ्ने, देवराव नवले, उदयसिंह पाटील, सुर्यकांत पाटील, संदिप काळे, दिग्विजय बागल, शंभुराजे जगताप, दादा येडे यांनी मनोगत व्यक्त केले. उदय पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतन केदार- सावंत, उपाध्यक्ष व सरचिटणीस गणेश चिवटे , युवक जिल्हाअध्यक्ष शंभुराजे जगताप, माजी सभापती बापूसाहेब पाटील,सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, सतिश शेळके, नागनाथ लकडे, अनिल गलांडे, प्रा.सुहास गलांडे, मनोहर हंडाळ, विशाल सरडे, नवनाथ गायकवाड, सचिन वेळेकर, प्रशांत नवले, हरिश्चंद्र खारमोडे, रामदास गुंडगिरे, महादेव नवले, सुनील ढवळे, अशोक ढवळे सर, शिवाजी चाकणे, डॉ. तारसे, डॉ. गुळवे, लक्ष्मण महानवर सर, किशोर जाधवर सर, राजुशेठ कटारिया, संतोष पाटील, ॲड. संतोष निकम, बाळासो जरांडे ,दादा कोकरे, कैलास शेठ निसळ, क्रांतीसिंह पाटील, भाजपाचे पदाधिकारी नरेंद्र ठाकुर, शाम सिंधी, शशिकांत पवार, जगदीश आगरवाल, ॲड. प्रियल आगरवाल,अमोल जरांडे, लक्ष्मण केकान, संजय घोरपडे, पै. ढाणे , डॉ. जिनेंद्र दोभाडा, सुहास निसळ, बबन नाना साळवे, दादासाहेब निकम, तुकाराम खाटमोडे, पत्रकार राजाराम माने, पत्रकार रविंद्र विघ्ने यांचेसह मिडीयाचे सर्व पत्रकार , रफिकभाई बागवान, सलिम शेख, तानाजी गुंजाळ, दत्ता कनिचे, मधुकर गुंडगिरे, पांडुरंग नवले, देवा नवले, सचिन पांढरे, जयकुमार बाठीया, बाबा मोरे, किशोर जोशी, सरपंच शरद भोसले, नंदकुमार जगताप, विलास सोनवणे, सोनबा कोकणे, नवनाथ फाळके, मनोज मत्रे, तुकाराम वसे , सचिन खराडे , दादा पवार यांचे सह हजारो मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. काल पासुन पारेवाडी रेल्वे स्टेशनवरून पुणे ते हरंगुळ/ लातुर अप/ डाऊन गाडी चा थांबा चालु झाला असुन या गाडीचा प्रवाशांनी वापर करावा, अशी माहिती या प्रसंगी देणात आली. कार्यक्रमानंतर सायंकाळी पोमलवाडी येथे सुर्यकांत पाटील यांचे फार्म हाऊसवर स्नेहभोजन कार्यक्रम माननीय खासदार साहेबांचे उपस्थित पार पडला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश