नारायण आबा पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली तर ती सोडू नये अशी भावना घारगावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी व्यक्त केली
नारायण आबा पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली तर ती सोडू नये अशी भावना घारगावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी व्यक्त केली
माढा लोकसभा मतदार संघात बदलाचे संकेत आता जनतेकडून मिळू लागले असून माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी येत्या काही दिवसात आपला योग्य तो निर्णय घ्यावा तसेच जर लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणुन उभे राहण्याची संधी मिळाली तर ती अजिबात सोडू नये असे रोखठोक मत घारगावच्या माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी आपले परखड मत व्यक्त केले. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचेकडे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आणि विकासाची दूर दृष्टी असल्याने आता मतदारांनी आपल्या भावना गावागावात, वाड्या वस्त्यावर व्यक्त केल्या आहेत. माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या पाठीमागे एकगठ्ठा मतदान असून माढा लोकसभा मतदारसंघात त्यांची भुमीका निर्णायक ठरणार असल्याने पाटील यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. प्रत्यक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवायची की पक्ष प्रवेश करुन विधानसभेसाठी सज्ज राहवयाचे याबाबत स्वतः माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे निर्णय घेतील सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार आहे. आणि त्यांचा विजय निश्चित आहे .