पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन- रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण
पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन- रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम
करमाळा. - करमाळा तालुक्यातील मध्य रेल्वेच्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांचे थांब्याचे मागणी करीता आज शनिवार दिनांक-९/०३/२४ रोजी असणारे रेल रोको आंदोलन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे ठोस आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय प्रवासी ग्रामस्थ व व्यापारी यांनी घेतला असुन, मागणी पुर्ण होणे पर्यंत लोकसभेच्या मतदान प्रक्रियेवर घेतलेला बहिष्काराचा निर्णय मात्र कायम ठेवला आहे. आज प्रवासी संघटने चे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ यांनी पारेवाडी रेल्वे स्टेशनला जाऊन याबाबतचे निवेदन स्टेशन प्रबंधक यांचे मार्फत तसेच पोलिस यंत्रणेचे अधिकारी यांना दिले. या प्रसंगी उपस्थितांनी रेल्वे बोर्ड व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेवर विश्वास व्यक्त करत तुर्तास रेल रोको स्थगित केल्याचे सांगितले, परंतु आमची मागणी मान्य न केल्यास रेल्वे बोर्डाचे विरुद्ध कोर्टात जाऊन सनदशीर परवानगीने रेल रोको पुन्हा करू असाही सुचक इशारा यानिमित्ताने दिला आहे. या प्रसंगी केत्तुर व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.