कुगाव बोट दुर्घटना ....प्रशासनाशी समन्वय ठेवून आहे...आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
कुगाव बोट दुर्घटना ....
प्रशासनाशी समन्वय ठेवून आहे...
आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
काल कुगाव ते कळाशी यादरम्यान जलवाहतूक करत असलेल्या अपघातग्रस्त बोटीसाठी शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू असून आपण सातत्याने जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी व तहसीलदार यांच्याशी समन्वय ठेवून आहोत तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनाही यांनाही दुर्घटनेची कल्पना दिली असून वरिष्ठ स्तरावरून मदती संदर्भात योग्य ती पावले उचलली जात आहेत.त्यामुळे लवकरच शोध कार्य संपेल अशी माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.
काल दिनांक 21 मे रोजी दुर्घटनाग्रस्त झालेल्या बोटीचे शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.आज दिनांक 22 मे रोजी एनडी आरएफ चे जवान कळाशी ता. इंदापूर या बाजूने दाखल झाले असून काल अपघातग्रस्त झालेली बोट ही इंदापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये असल्यामुळे शोध कार्यही त्या बाजूनेच सुरू आहे. त्या ठिकाणी कुर्डूवाडीच्या प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर, करमाळाच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे या प्रत्यक्ष उपस्थित असून करमाळा व इंदापूर तालुक्याची पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा तसेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते या शोध कार्यामध्ये सहभागी आहेत. स्थानिक च्या 3 बोटी तसेच एन डी आर एफ च्या जवानांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू आहे.
शोध कार्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड ,बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत काका सरडे, वाशिंबे गावचे सरपंच तानाजी बापू झोळ, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील, चेअरमन सचिन गावडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते सहभागी आहेत.