संघर्ष योध्दा मनोज जरांगे -पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास करमाळा तालुक्यातील जनतेचा उस्फुर्त जाहीर पाठींबा ... शंभूराजे जगताप

संघर्ष योध्दा मनोज जरांगे -पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास करमाळा तालुक्यातील जनतेचा उस्फुर्त जाहीर पाठींबा ... शंभूराजे जगताप                               

करमाळी प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे 

मागील जून पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी मौजे आंतरवाली सराटी जि .जालना या ठिकाणी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास करमाळा शहरासह  तालुक्यातील जनतेचा उस्फुर्त जाहीर पाठींबा असून मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी निस्वार्थपणे जन आंदोलन करून जो लढा उभारलेला आहे त्यास फक्त मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण अठरापगड जातीच्या बांधवांचा सुद्धा पाठिंबा आहे . मराठा समाजातील कित्येक लोक आजही खूप मागास आहेत . शिक्षण घेण्यासाठी मराठा युवकांना आरक्षणाची गरज आहे . गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील यूवकांना नोकरी मिळत नाही , हा खूप मोठा अन्याय आहे जरांगे पाटलांची आरक्षणाची मागणी न्याय्य असून त्यामध्ये तिळ मात्र स्वार्थ दिसत नाही . तालुक्यातील सर्व जाती -धर्माच्या लोकांचा मराठा आरक्षण जनआंदोलनास पाठींबा असून स्वातंत्रपूर्व काळापासून करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण व समाजकारणात मराठा बांधवां सह  सर्व जाती धर्मा सोबत जगताप गट नेहमीच राहीला आहे . याचाच एक भाग म्हणून जगताप गटाचे यूवा नेते शंभूराजे जगताप हे बाजार सामिती चे संचालक दादासाहेब लबडे आणि सागर दोंड  यांनी मराठा आंदोलनास  पाठींबा देण्यासाठी दि .१२ जून रोजी करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजातील युवक व बुजुर्ग नागरिकांना करमाळा येथून आंतरवाली सराटी  येथे जावून आरक्षण आंदोलनास पाठिंबा द्यायला जाण्यासाठी आवाहन केले होते यामध्ये जगताप गटाचे यूवा नेते शंभूराजे जगताप हे गट - तट - पक्ष बाजूला ठेवून सहभागी झाले होते . या वेळी तालुक्यातील ६० वाहनांमधून शेकडो यूवक व बुजूर्ग सहभागी झाले होते .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश