मागासवर्गीय शेतकऱ्यांचे उपोषण !दखल न घेतल्यास आरपीआय करणार आंदोलन -नागेश कांबळे
मागासवर्गीय शेतकऱ्यांचे उपोषण !
दखल न घेतल्यास आरपीआय करणार आंदोलन -नागेश कांबळे
करमाळा-
महादेव गबाजी कांबळे हे मागासवर्गीय शेतकरी असून वांगी नं १ येथील शेतजमीन गट नं 385,387 व 397 मधून मुख्यमंत्री ग्रामसङक योजनेतून होत असलेल्या रस्त्यास विरोध करण्यासाठी समस्त महारवतन कब्जेवहिवाट यांच्यातर्फे महादेव गबाजी कांबळे हे मागासवर्गीय शेतकरी मा तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर चक्री उपोषणास बसलेले असून त्यांनी या शेतजमिनीसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे
या उपोषणास रिपाई (आ) चा जाहीर पाठिंबा असून सबंधित दोषींवर कारवाई ना झाल्यास १९/०६/२४ रोजी दु १२:३० वा करमाळा तहसील कचेरीवर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा नागेश कांबळे यांनी दिला आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की बेकायदेशीर बळजबरीने शेतीची नासधूस करीत रस्ता बनविणाऱ्या शासनप्रशासनातील सबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन नुकसान भरपाई देण्यात यावी