नुतन खासदारांच्या विजयाचे शिल्पकार चौका-चौकात फिरु लागले, दशरथआण्णा कांबळे

नुतन खासदारांच्या विजयाचे शिल्पकार चौका-चौकात फिरु लागले, दशरथआण्णा कांबळे

करमाळा-प्रतिनिधी
             
माढा लोकसभा निवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. येथील राष्ट्रवादीची लोकसभेची पारंपारिक जागा परत एकदा राष्ट्रवादीला मिळते का? त्याचप्रमाणे मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा या निवडणुकीवर कितपत परिणाम करणार? या सर्व बाबींच्या अनुषंगाने व तत्वतः भाजपाने १० वर्षांमध्ये नागरिकांच्या नव्हे तर उद्योगपतींच्या विकासासाठी राबविलेली धोरणे, यामुळे यावेळेसची संपुर्ण देशामधील लोकसभा निवडणुक जनतेनेच हातामध्ये घेतली होती. त्याअनुषंगाने पक्षाचे, गटाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यापेक्षा जनताच उत्स्फुर्तपणे या निवडणुकीच्या प्रचारात उतरलेली सर्वांना पहायला मिळाली. परंतु माढा लोकसभा निवडणुकीमध्ये व त्याअंतर्गत करमाळा तालुक्यामध्ये पदाधिकारी व काही मोजके कार्यकर्ते नुतन खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय आमच्यामुळेच सहज शक्य झाला असल्याच्या अविर्भावात वावरताना दिसुन येत आहेत. अशा प्रकारच्या कानपिचक्या शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी INDIA आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेतल्या आहेत.
            यावेळी पुढे बोलताना कांबळे म्हणाले कि, INDIA आघाडीमध्ये महाराष्ट्रातील अनेक छोट्या-मोठ्या घटक पक्षानी त्यांच्या कुवतीप्रमाणे भाजपाला विरोध करण्यासाठी त्यांची ताकद पणाला लावली होती. परंतू INDIA आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील प्रमुख भाजपविरोधी गटांनी एकत्र येत बैठका घेऊन, कोणती ही अपेक्षा न ठेवता प्रचार-प्रसार स्वतः उत्स्फुर्तपणे केला. परंतु INDIA आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार-प्रसाराला कधी अवचुकून घराच्या बाहेर पडलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाच धैर्यशील मोहिते-पाटील यांना खासदार केल्याचा आव आणल्याचा प्रकार सध्या तरी दिसुन येत आहे. आता खासदार आमचाच म्हणुन गप्पा मारताना दिसत आहेत. आमदारकीची भावी स्वप्ने पाहणाऱ्यानी तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहनमालकांची करोडो रुपयांची बिले कारखानदारांनी दिली नव्हती. यावेळी का कोणता ही लोकप्रतिनिधी एका चकार शब्दाने सुद्धा बोलला नाही? विधानसभेच्या सुगीला घराच्या बाहेर पडण्यापेक्षा पाच वर्षे जनतेच्या अडलेल्या कामांची सोडवणूक केली असती, तर विधानसभेच्या आमदारकीची पेरणी आतापर्यंत चांगल्या जोमात बहरली असती. असो....खासदार जरी INDIA आघाडीचा झाला असला, तरी आता विविध पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेची मोठ्या हुरपाने कामे केली पाहिजेत. अशा प्रकाचा महत्वाचा सल्ला यावेळी कांबळे यांनी दिला आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश