मकाई कारखान्याच्या संचालक पदी महेश तळेकर सर यांची बिनविरोध निवड....

मकाई कारखान्याच्या  संचालक पदी महेश तळेकर सर यांची बिनविरोध निवड....

 करमाळा प्रतिनिधीत हर्षवर्धन गाडे 
           
 करमाळा तालुक्यातील केम येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच मकाई कारखान्याचे सभासद महेश तळेकर यांची मकाई कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संदर्भात कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी तळेकर यांना  संचालक निवडीचे पत्र दिले आहे. तरी यावेळी मकाई कारखान्याच्या स्वीकृत सदस्यपदी सहा जणांची निवड कण्यात आली आहे. 
           महेश तळेकर यांच्या माध्यमातुन बागल गट केम परिसरात परत एकदा विधानसभेची मोर्चे बांधणी करत असल्याचे दिसत आहे. गटाच्या कार्यकर्त्याना विविध पदांवर न्याय देऊन, विधानसभेच्या अनुषंगाने त्यांना सक्रिय केले जात असल्याचे आता बोलले जात आहे. परंतु एकमात्र खरे कि, गटाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे बागल गटाकडून तळेकर यांना मकाई कारखान्याच्या संचालक पदी निवड करुन त्यांच्या एकनिष्ठतेला न्याय दिल्याचे दिसुन येत आहे. तरी तळेकर यांच्या निवडीमुळे केममध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश