करमाळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न.

करमाळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न.


आज गुरुवार दिनांक 20/ 6 /2024 रोजी करमाळा स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यालय जिन मैदान. येथे सकाळी ११.०० वा. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये 
1.स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्षपदी पुनश्च सुदर्शन शेळके,यांची निवड करण्यात आली 
2.तालुका संघटना कार्याध्यक्षपदी बापूराव वाडेकर 
3.करमाळा तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी प्रशांत नाईकनवरे सरपंच पोटेगाव,
4.स्वाभिमानी शेतकरी पक्ष तालुका अध्यक्षपदी पुनश्च बापू फरतडे,
5.तालुका कामगार संघटना अध्यक्षपदी सुहास काळे पाटील,  6.तालुका युवा आघाडी उपाध्यक्षपदी तानाजी शिंदे, 7.शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्षपदी निलेश शिंदे,8.स्वाभिमानी पक्ष उपाध्यक्षपदी भीमराव ननवरे,                    9.तालुका कार्य उपाध्यक्षपदी मारुती निळ. यांच्या करमाळा तालुका कार्यकारणी मध्ये नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत. यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे व मार्गदर्शक गणेश मंगवडे यांनी आपले विचार व्यक्त केले व शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील असे विचार व्यक्त केले यानंतर सर्व नवनियुक्त कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले यावेळी दीपक फरतडे, सचिन बरडे, छगन ससाने सरपंच जातेगाव, बाबाजान खान आवटी, व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    संघटना ही सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारे संघटना आहे. असे विचार रवींद्र गोडगे यांनी व्यक्त केले. या कार्यकारिणीच्या निवडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश