अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत समृद्धी लोंढे हिने पटकाविला राज्यात दहावा क्रमांक....
अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत समृद्धी लोंढे हिने पटकाविला राज्यात दहावा क्रमांक....
टेंभुर्णी-प्रतिनिधी
प्रोगेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कुल बेंबळे इ. ४ थी तील विद्यार्थीनी समृद्धी अनिल लोंढे हिने अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात दहावा क्रमांक पटकाविला आहे. सदरच्या राज्यस्तरीय परिक्षेचे भव्य-दिव्य बक्षीस वितरण इंदापूर येथील वाघ पॕलेस मधील सभागृहात संपन्न झाले. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी यशवंत शितोळे (सेवानिवृत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली तर श्रीकांत पाटील (तहसिलदार इंदापूर), सुर्यकांत कोकणे (पोलीस निरीक्षक इंदापूर), अजिंक्य खरात (गटशिक्षणाधिकारी), डॉ. महेश निंबाळकर (अध्यक्ष, व्यसनमुक्ती केंद्र इंदापूर) इ. प्रमुख मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती.
समृद्धी लोंढे हिला डॉ. महेश निंबाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी, शाल, पुष्पगुच्छ देऊन, तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. समृद्धी हिने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव अनपट, मुख्याध्यापक प्रभाकर सर, वर्गशिक्षिका महाडिक मॕडम यांनी विशेष कौतुक केले आहे. तर IAS अधिकारी वैभव वाघमारे (काका), माळेगाव मा. सरपंच सुर्यकांत लोंढे (आजोबा), माळेगाव मा. सरपंच बबन किर्ते (आजोबा), यशपाल लोंढे (चुलते, उद्योजक), माळेगाव पोलीस पाटील धम्मपाल लोंढे (चुलते), शुद्धोधन लोंढे (चुलते), मिलींद लोंढे यांनी कौतुक करत पुढील भावी आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया लोंढे या समृद्धीच्या आई शिक्षिका असुन, मावशी प्रा. शितल वाघमारे यांनी सुद्धा सदरचे यश मिळविण्यासाठी, समृद्धीच्या वेळोवेळी समस्या सोडवत व योग्य मार्गदर्शन करत तिला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे.