जिद्द ,चिकाटी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही यश मिळवता येते...कु. प्रगती पवार हिची अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठीझालेली निवड
जिद्द ,चिकाटी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही यश मिळवता येते...
कु. प्रगती पवार हिची अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी
झालेली निवड
युवा पिढीला प्रेरणादायी
- आमदार संजयमामा शिंदे
प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
जिद्द ,चिकाटी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही यश मिळवता येते कु. प्रगती विजयराव पवार हिची अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी झालेली निवड युवा पिढीला प्रेरणादायी असे मत करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवदादा माळी, मकाईचे माजी संचालक विवेक येवले , सावंत गटाचे युवा नेते नगरसेवक संजय आण्णा सावंत ,विजयराव पवार ,मनोज पवार उपस्थित होते. कु. प्रगती विजयराव पवार हिची अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सर्दन कॅलिफोर्निया लॉस एंजिलीस येथे उच्च शिक्षणासाठी( एम. एस) प्रवेश मिळाल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पुढे बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, सध्याची युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जिद्द चिकाटी बरोबर कठोर परिश्रमाची गरज आहे. कु. प्रगती विजयराव पवार हिने आपल्या आई-वडिलांचे ऋण फेडण्याचे काम केले असून पवार परिवाराचेही नावलौकिक वाढवला असून तिचा आदर्श घेऊन आजच्या युगातील मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी व आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
कु. प्रगती पवार ही जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष,महाबीजचे माजी संचालक विजयराव पवार यांची कन्या आहे.आमदार संजयमामा शिंदे यांनी पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.