पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बंद असेलले आरओ फिल्टर राष्ट्रीय समाज पक्षाच्या इशारानंतर चालू करण्यात आले..

पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून बंद असेलले आरओ फिल्टर राष्ट्रीय समाज पक्षाच्या इशारानंतर चालू करण्यात आले..

पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून सर्वसामान्यांनां आरोचे फिल्टर चांगले पाणी अल्प दरात मिळण्याच्या उद्देशाने निलज संगोबा, पोथरे, जिल्हा परिषद शाळा येथे आरओ फिल्टर प्लॅन्ट लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आले होते. परंतु गेली सहा सात महिन्यांपासून ठेकेदारांच्या दुर्लक्षतेमुळे आरओ फिल्टर बंद असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत व सरपंच अंकुश शिंदे यांच्या निदर्शनास राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी प्रसिद्धी, निवेदनाद्वारे निदर्शनास आणून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन 
पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेबांनी अवघ्या दोनच दिवसात पोथरे,संगोबा येथील बंद असलेलें आरओ पाणी फिल्टर तात्काळ चालू करण्यात आदेश दिले आणि ते चालू देखील झाले. यामुळे मा. राऊत साहेबांचे पोथरे निलज,संगोबा परिसरात कौतुक होत आहे. यामध्ये सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक हरीभाऊ दरवडे यांनी देखील ठेकेदाराकडे सतत पाठपुरावा करून उर्वरित काम पूर्ण करून घेतले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश