भीम आर्मीच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तरेश्वर कांबळे यांची निवड..

भीम आर्मीच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तरेश्वर कांबळे यांची निवड..

करमाळा प्रतिनिधी: 

राज्यासह देशात  देखील आपल्या कामाचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त केलेल्या भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उत्तरेश्वर कांबळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह जालना याठिकाणी  संघटनेची महत्त्वपूर्ण बैठकी आयोजित करण्यात आली होती.भीम आर्मीप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे उपाध्यक्ष भुषण देवगडे  ,राजेश गवळी ,रणजित माने ,तेलंगणा प्रदेश अध्यक्ष प्रशांत निमसटकर अॅड सुमेध आवारे , प.महाराष्ट्र प्रमुख संतोष थोरवडे , अमोल चिमणकर, सुनिल पाटील, चंद्रकांत जोंधळे ,मनोज कांबळे ,आदेशभाऊ शेंडे ,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले 
नगीना मतदारसंघातून खासदार भाई चंद्रशेखर आझाद रावण निवडून आले , त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आजच्या बैठकीत मांडण्यात येत आहे. त्याच बरोबर 
दादर रेल्वे स्थानकाचे नाव 'विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनल्स' असे नामांतर करण्यात यावे , मुंबईतील इंदू मिलमध्ये होणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राज्यसरकारने कृती करावी , असा ठराव ह्या बैठकीत करण्यात येत आहे.  दीक्षाभूमीवर विकासाच्या नावावर सध्या जो संभ्रम निर्माण करण्यात आला आहे ती संभ्रमावस्था दूर करून दिक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्यात यावा आणि त्याच्या परिसरात असणारे कॉलेज वगैरे ताबडतोब दूरवर स्थलांतरित करण्यात यावे , असा ठराव ह्या बैठकीत करण्यात आला असून संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश