राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा विधानसभा स्वबळावर लढवणार - अँड संजय माने.

राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा विधानसभा स्वबळावर लढवणार - अँड संजय माने.

राष्ट्रीय समाज पक्षाची करमाळा येथे बैठक संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अँड.संजय माने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते हे होते. यावेळी तालुका अध्यक्ष जिवन होगले, तालुका प्रभारी नामदेव पालवे, सामाजिक कार्यकर्ते सुहास ओहोळ, भिमदलचे जिल्हा अध्यक्ष सुनील भोसले, रासपा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल भिसे, इंजि.प्रवीण होगले, सुधीर ठोंबरे, शलैश शिंदे,अमोल सुरवसे, तात्या वायसे,भाऊ हाके,विकास मेरगळ, रघुवीर आडसुळ यांच्या प्रामुख उपस्थितीत करमाळा येथे बैठक पार पडली.
या आयोजित बैठकी वेळी अँड संजय माने, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे यांनी मनोगत व्यक्त केले. 
या प्रसंगी अँड माने म्हणाले की, करमाळा विधानसभा निवडणुक रासप स्वबळावर लढवणार असून सर्व रासप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यात प्रत्येक गावा-गावात, मतदारापर्यंत पोहोचून गाव बैठकीच्या नियोजना द्वारे बुथ,गणांची बांधणी व कार्यकर्ते जोडणे गरजेचे आहे.तरच आपण पुढील लढाई यशस्वी पणे लढू शकतो, आणि पक्षाचे ध्येय धोरणे,विचार तळागाळापर्यंत समजून सांगावेत. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब हे वंचित, शेतकरी, कष्टकरी घटकातील सर्व सामाजाला सामावून घेत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व जाती-जमातीचा एकमेव पक्ष आहे.चार राज्यात पक्षाचे चांगले वारे आहे.होऊ घातलेल्या विधानसभेसाठी तालुक्यात इतर प्रमुख नेत्यांची दिशा भरकटलेली असल्याने समाजात असंतोष आहे. राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा विधानसभेसाठी पद्धतशीर पणे योग्य पर्याय कसा ठरू शकतो हे लोकांन पर्यंत जाऊन पटवून द्यायला हवे असे आदेश अँड. संजय माने यांनी उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना बैठकी दरम्यान दिले.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश