उमरड येथे मा. नारायण आबा पाटील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन संपन्न
उमरड येथे मा. नारायण आबा पाटील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन संपन्न
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
उमरड येथील यूपीसी एमपीसी व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गरज पूर्ण व्हावी वाचनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावेत म्हणून माजी सरपंच संदीप मारकड पाटील यांनी माननीय नारायण आबा पाटील सार्वजनिक वाचनालयाचे रजिस्ट्रेशन केले
संबंधित वाचनालयाचे उद्घाटन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
उद्घाटन प्रसंगी बोलताना नारायण आबा पाटील म्हणाले वाचनालयाचे उद्घाटन झाल्याने उमरड गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांचे व वाचकांची सोय झाली असून एमपीसी करणारे विद्यार्थी व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभ्यासिकेची सोय झालेली आहे वाचकांनी याचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या जीवनाची उन्नती करून घ्यावी मला खात्री आहे या वाचनालयामुळे या भागातून चांगल्या अधिकाऱ्यांची निर्मिती होईल असेच स्तुत्य उपक्रम कार्यकर्त्यांनी राबवावेत असे आव्हान नारायणगाव पाटीलंनी केले वाचनालय स्थापन केल्यामुळे माझी सरपंच संदीप मारकड पाटील यांचे नारायण आबा पाटील यांनी कौतुक केले व असेच सर्वांना विश्वासात घेऊन अधिकाधिक विकास कामे करावीत आशे आव्हान केले
या वेळी उपस्तीत सभापती अतुल भाऊ पाटील,बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम, राष्ट्रवादीचे चोपडे साहेब, श्रीमंत चौधरी, गणेश चौधरी,चंद्रशेखर पाटील, तात्या सरडे , गिरी सर, नंदकिशोर वलटे, इरफान शेख, इसाक शेख, रसूल शेख,पठाडे सर, कुंडलिक चोरमले, विकास बदे,विलास बदे,जनार्धन तात्या मारकड,रिटेवाडी चे सरपंच रिटे, डॉक्टर शेळके, फोजमलं पाखरे, डॉक्टर भाग्यवंत बंडगर नामदेव कोठावळे, भास्कर पडवळे, आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.