उमरड येथील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी सिमेंटच्या नळ्या उमरड येथील ओढ्यावर पोहोच केल्या ग्रामस्थांमध्ये आनंद
उमरड येथील ओढ्यावर पूल बांधण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी सिमेंटच्या नळ्या उमरड येथील ओढ्यावर पोहोच केल्या ग्रामस्थांमध्ये आनंद
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
उमरड ते विहाळ रस्त्यावरील उमरड हद्दीतील ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून प्रवास करावा लागत होता स्त्रियांना जाण्या येण्यासाठी गैरसोयीचे झाले होते मोटर सायकल सुद्धा ओढ्याच्या पाण्यातून नेता येत नव्हती ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी ताबडतोब पूल बांधा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे
उमरड येथील ग्रामस्थ यांनी नारायण आबा पाटील यांची भेट घेऊन आम्हाला सिमेंटचे पाईप टाकून तात्पुरत्या स्वरूपाचा जाण्या येण्यासाठी पूल बांधून द्यावा अशी मागणी केली त्या मागणीचा विचार करून ताबडतोब माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी सिमेंटचे पाईप ओढ्यावरती पोहोच केले व पूल बांधण्याची व्यवस्था केलेली आहे यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे अशी माहिती ज्ञानेश्वर बदे, संतोष कोठावळे, बंकट बदे, गोवर्धन कोठावळे, राघू बदे, अशोक बदे यांनी दिली