उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली मागणी

उमरड ते केडगाव जाण्या येण्यासाठी रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग करण्यात यावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे केली मागणी 

करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे 


करमाळा तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद,बेंगलोर, चेन्नई असा मध्य रेल्वे मार्ग गेला आहे रेल्वे मार्गाच्या उत्तर दिशेला उमरड,करमाळा,राशीन,भैरवनाथ साखर कारखाना व दक्षिण दिशेला केडगाव,चिखलठाण,कुगांव,शेटफळ,दहीगाव आशी विभागणी झाली आहे 
भुयारी मार्ग झाला पाहिजे या साठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम,मा.सरपंच संदीप मारकड,चंद्रशेखर पाटील,डॉ.शेळके यांनीं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची अकलूज येथे भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली 
राजाभाऊ कदम यांनीं खासदार मोहिते पाटलांना सांगितले उमरड ते केडगाव भुयारी मार्ग झाल्यास केडगाव,चिखलठाण,कुगांव,दहीगाव,
शेटफळ या गावच्या १५ हजार लोक संखेला उमरड मार्गे करमाळा,राशीन,भिगवण,भैरवनाथ साखर कारखाना,मकाई साखर कारखाना, आंबालिका साखर कारखाना,बारामती अग्रो साखर कारखाना इकडे जाण्या येण्या साठी व ऊस वाहतूकी साठी जवळचा मार्ग होणार आहे ३० किलोमीटर बचत होणार आहे सर्व म्हणणे खासदार मोहिते पाटलांनी ऐकून घेऊन प्रयत्न करू अशे आश्वासन दिले
त्याचं प्रमाने उमरड येथे आरोग्य केंद्राला डॉक्टर कर्मचारी उपलब्ध करून दवाखाना सुरु करावा,उमरड अहिल्यादेवी टेकडीवरती सभागृह द्या,केडगाव उमरड पंतप्रधान सडक योजेनेतुन निधी ध्या, उमरड येथे राष्ट्रीयकृत बँक झाली पाहिजे अशा विविध विकास कामाची मागणी केली.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश