शेडशिंगे ते पिंपळनेर रस्ता खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास - युवा नेते महेश ताटेउपळवटे-संदिप घोरपडे
शेडशिंगे ते पिंपळनेर रस्ता खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास - युवा नेते महेश ताटे
उपळवटे-संदिप घोरपडे
माढा तालुक्यातील शेडशिंगे ते पिंपळनेर हा रस्ता अतिशय खराब झाला आहे,त्यामुळे नागरिकांना अनेक आडचणींना सामोरे जावे लागत आहे, जागोजागी या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने पावसाळ्यात अशा पद्धतीने पाणी साचत आहे, ह्या पाण्यातून वाट काढत असताना गाड्या घसरून पडण्याची दाट शक्यता असते,गाड्या पडून जीवितहानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष द्यावे,व हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून देण्यात यावी अशी मागणी शेडशिंगे गावचे युवा नेते महेश ताटे यांनी केली आहे, हा रस्ता टेंभुर्णी कुर्डूवाडी रोडला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावरती सारखी रहदारी आपल्याला बघायला मिळत आहे, हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्याने या रस्त्याकडे जातीने प्रशासनाने लक्ष घालून त्या रस्त्याचे काम करावे,अशी मागणी महेश ताटे यांच्यासह शेडशिंगे गावातून होत आहे, हा रस्ता डांबरी झाल्यावर दळणवळण मार्गाचा रस्ता मोकळा होणार आहे,शाळेतील विद्यार्थ्यांसाठीही हा रस्ता तितकाच महत्त्वाचा आहे,त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी शेडशिंगे गावांमधून होत आहे,