श्री तीर्थ क्षेत्र संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज देवस्थान करमाळा तालुक्यामध्ये येत आहे श्री संगोबा नाव दोन नद्यांच्या संगमावर असल्यामुळे संगोबा हे नाव पडलेले आहे

श्री तीर्थ क्षेत्र संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज देवस्थान करमाळा तालुक्यामध्ये येत आहे श्री संगोबा नाव दोन नद्यांच्या संगमावर असल्यामुळे संगोबा हे नाव पडलेले आहे 

सीना नदीच्या काठावर व कानवाळा नदीच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र आहे सीना नदीचे नाव श्रीराम व सीतामाई लक्ष्मण वनवासात असताना त्यांनी या नदीमध्ये आंघोळ केल्यामुळे त्यांचा सिन गेला त्यामुळे शिना नदी म्हणून नाव पडले श्री आदिनाथ देवस्थान हे सर्व देवस्थानच्या अगोदरची देवस्थान आहे पंढरपूरचे वास्कर महाराज हे पैठणला पायी दिंडी घेऊन चालले असताना त्यांना दृष्टांत झाला मी सीनामाईच्या काठी वनामध्ये माझे मंदिर आहे तू येथे येऊन माझ्या मंदिराचा जीर्णोद्धार कर वासकर महाराज सर्व शिष्यांना घेऊन आले असता जंगलामध्ये झाडाझुडपामध्ये भव्य असं मंदिर त्यांना दिसले त्यांनी सर्व शिष्यांच्या मदतीने झाडे झुडपे तोडून मंदिराची सुशोभीकरण केले सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना महाशिवरात्री दिवशी मंदिरामध्ये भजन कीर्तन व नामस्मरण अन्नदान मोठ्या प्रमाणात होऊ लागले आणि आदिनाथ महाराज हे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांचा ओघ सुरू झाला श्री गुरु वास्कर महाराज यांनी निलजचे गायकवाड यांना महापूजेचा व सेवा करण्याचा मान दिला ती परंपरा आज पर्यंत चालू आहे गायकवाड सर्व मंदिराची देखभाल करतात दोन टाईम आरती सर्व पूजा निस्वार्थपणे करत आहेत या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक साधू ऋषी वास्तवास होते श्री गुरु मुरलीधर महाराज यांचे शिष्य श्री गुरुरामदास महाराज श्री ओंकार दास श्री प्रेमदास महाराज श्री संत सर्जेराव गायकवाड अशी परंपरा श्री आदिनाथ महाराज मंदिरावरती चालू आहे श्री आदिनाथ मंदिर हे हेंबाडपंती बांधलेला आहे सीना नदीच्या काठावर रम्य असे वातावरण आहे महाराष्ट्र मधून अनेक जिल्ह्यातून भाविक भक्त महाशिवरात्री दिवशी येत असतात गाव गावच्या पायी दिंड्या घेऊन वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत मंदिरामध्ये अनेक गैरसोय आहेत भाविक भक्तांसाठी स्वच्छ निर्मळ पाणी उपलब्ध नाही शौचालयाची सुविधा नाही अजून या मंदिराचा तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट नाही तरी शासनाने या मंदिरामध्ये पिण्याचे पाण्याची सोय करावी अशी मागणी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने करण्यात येत आहेंसंगोबा देवस्थान वरती पिण्याच्या पाण्याची व सौचालयाची सोय नाही तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केले आहे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश