केम चे कुंकू मुंबई ला व्यापाऱ्यांना यावं लागतं सोलापुरात.

केम चे कुंकू मुंबई ला व्यापाऱ्यांना  यावं लागतं सोलापुरात.


देशासह जगात प्रसिद्ध असलेल्या करमाळा तालुक्यातील केमच्या कुंकूची वाहतूक व्यवस्था रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कोलमडलेली आहे. रेल्वेचा पूल डोकेदुखी बनलेला असून केम येथे रेल्वेचा मार्ग असूनही रेल्वे स्टेशनवर मालधक्का  नसल्याने कुंकू कारखानदार अडचणीत सापडले आहेत. या स्थानकावरून माल धक्का सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील केम हे कुंकू निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे केम येथील कुंकवाला देशभरातून मागणी आहे या ठिकाणी 50 कुंकवाचे कारखाने आहेत. या कारखान्यातून दररोज 70 टन कुंकू ची निर्मिती होते. दरमहा वीस ते बावीस कोटींची उलाढाल येथे होते. येथील कुंकवाला  देशभरात प्रसिद्ध असलेल्या मंदिराच्या परिसरात मोठी मागणी आहे. केम येथून कुंकू  बाजारात पाठवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था चांगली नसल्याने कारखानदारासमोर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. केम गावाची जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली असून रेल्वेचा पूल अरुंद व कमी उंचीचा असल्याने पुलाखाली सतत पाणी साठलेले असते त्याशिवाय पुलाखाली मोठ-मोठे खड्डे आहेत त्या पुलातून कुंकवाच्या वाहनांची वाहतूक होऊ शकत नाही. गावाला जोडणारा टेंभुर्णी कडून येणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. त्यामुळे मालमोटार चालक वाहतूक करण्यासाठी तयार होत नाहीत. शिवाय वाहतूक भाड्याची जास्त मागणी  करत असल्याने कारखानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. केम रेल्वे स्थानकावर चेन्नई मुंबई एक्सप्रेस ला थांबा होता परंतु कोरोना महामारीनंतर थांबा बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे केम परिसरातील नागरिकांना सोलापूर येथे जाण्यासाठी सकाळी रेल्वे नाही.
 चौकट घेणे..
 या गाड्या येतात केम रेल्वे स्टेशनवर...
 केम रेल्वे स्टेशन मधून २०२३-२४ या आर्थिक वर्षात  49 हजार 614 प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वे स्टेशनला ३७.२७ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे केम रेल्वे स्टेशनवर हैदराबाद मुंबई एक्सप्रेस, पुणे हरंगुळ एक्सप्रेस, पुणे सोलापूर डेमो दिवस रात्र, दौंड सोलापूर स्पेशल डेमो दिवसा, कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस पुणे कडे जाताना, दादर पंढरपूर सातारा एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस.
 कोट घेणे..‌
 केम रेल्वे स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा नाही यामुळे येथील कारखानदारांना कुर्डूवाडी येथून प्रवास करावा लागतो कुंकवाची वाहतूक सुद्धा सोलापूर किंवा कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन वरून करावी लागते कुंकूच्या वाहतुकीसाठी कुर्डूवाडी येथील माल धक्का केम येथे  मंजूर करून सुरू करावा.
माजी सरपंच केम अजित तळेकर 

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश