तहसील कार्यालय मौलाली माळावर बांधण्यास बहुजन संघर्ष सेनेचा विरोध शुक्रवारी भव्य निदर्शने करणार - राजाभाऊ कदम
तहसील कार्यालय मौलाली माळावर बांधण्यास बहुजन संघर्ष सेनेचा विरोध शुक्रवारी भव्य निदर्शने करणार - राजाभाऊ कदम
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मौलाली माळ गुळसडी रोड जवळ नूतन तहसील कार्यालय बांधण्याच्या भूमिपूजनाचे उद्घाटन केले मात्र मौलाली माळावरती तहसील कार्यालय बांधण्यास बहुजन संघर्ष सेनेचा विरोध आहे
म्हणून दिनांक 4 / 10 / 2024 रोजी तहसील कार्यालय करमाळा च्या समोर बहुजन संघर्ष सेना भव्य निदर्शने करणार आहे.
इंग्रजांनी तहसील कचेरी बांधत असताना तहसील कचेरीच्या अवतीभवती भरपूर जागा शिल्लक ठेवलेली आहे तहसील कचेरीच्या शेजारीच पोलीस स्टेशन, पंचायत समिती, संस्था निबंधकाची कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय ही सर्व कार्यालय असून देखील भरपूर जागा शिल्लक आहे मग हसील कार्यालय मौलाली माळावरती बांधण्याचा निर्णय कशासाठी घेतला ?
हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडलेला आहे आज असणाऱ्या तहसील कार्यालयापासून एसटी स्टँड जवळ आहे, करमाळा शहराची बाजारपेठ जवळ आहे, त्यामुळे करमाळा शहराचे दळणवळण वाढते शहरातील व तालुक्यातील सर्व लोकांच्या सोयीचे तहसील कार्यालय आहे हे तहसील कार्यालय मौलाली माळावरती बांधण्यात येऊ नये मौलाली माळावरती तहसील कार्यालय बांधल्यास बाजारपेठेवरती परिणाम होणार आहे शिवाय मौलाली माळावरती नॅशनल हवे रोड असल्यामुळे खेड्यातील लोकांचे अपघात होण्याची शक्यता आहे शिवाय एसटी स्टँड पासून जास्त अंतरावरती पडणार असल्याने लोकांच्या गैरसोयीचे होणार आहे त्यामुळे मौलाली माळावरती तहसील कार्यालय बांधण्यास बहुजन संघर्ष सेनेचा विरोध आहे विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील जनतेने दिनांक 4 /10/ 2024 रोजी वार शुक्रवार ठीक सकाळी ११:०० वाजता तहशील कार्यालयासमोर उपस्थित राहून निदर्शनास पाठिंबा द्यावा असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
निदर्शने करणार असल्या बाबातचे निवेदन तहसीलदार शिलपा ठोकडे मॅडम ,पोलीस निरीक्षक घुगे साहेब यांना दिले आहे.