करमाळा तालुक्यातील आठ गावातील वाडी वस्तीवर सिंगल फेज वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५१ लाख रुपये निधीस मंजुरीदिग्विजय बागल यांनी दिली माहिती
करमाळा तालुक्यातील आठ गावातील वाडी वस्तीवर सिंगल फेज वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५१ लाख रुपये निधीस मंजुरी
दिग्विजय बागल यांनी दिली माहिती
करमाळा प्रतिनिधी-
करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता व विजेचा वापर लक्षात घेता करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आठ गावातील वाड्या वस्त्यावर सिंगल फेज वीज पुरवठा सुरू व्हावा या संदर्भात नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांनी आज दिली. याबाबत अधिक माहिती देताना बागल म्हणाले की करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये व कमी दाबाने होणारा वीज पुरवठा तसेच वारंवार विद्युत प्रवाह बंद पडणे त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे निमगाव (ह)येथील रोकडे वस्ती, वायकुळे, भोसले वस्ती येथे सिंगल फेज वीज पुरवठा व स्वतंत्र डी पी साठी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखडा निधीतून मधून ७.५० लाख रुपये,तसेच कोर्टी येथील शिंदे वस्ती साठी ९.६७ लाख रुपये,भिलारवाडी येथील आरकिले वस्ती साठी ७.५३ लाख रुपये, सावडी येथेजाधव वस्ती साठी २.९४ लाख रुपये,गोरेवाडी येथे ४.७८ लाख रुपये,उंदरगाव निकत वस्ती साठी ५.३७ लाख रुपये, गौडरे येथील प्रियंका संभाजी हनपुडे यांच्या येथे डी पी व वीज पुरवठा सुरू होणे साठी ६.५५ लाख रुपये,जातेगाव साठी ६.४६ लाख रुपये अशा एकूण ५०.८० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे या गावांतील विजेचा प्रश्न तात्काळ निकाली निघेल असे सांगितले.करमाळा तालुक्यामधील वरील गावांमध्ये सिंगल फेज वीज पुरवठा व डीपी प्रस्तावांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष मंजुरी देऊन त्याची प्रशासकीय मंजुरी देखील कार्यालयीन स्तरावर घेतली आहे. त्यामुळे या गावांमधील सिंगल फेज डीपीची कामे तातडीने व वेळेत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बागल यांची जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्यानंतर आपल्या कार्याची चूनूक अवघ्या एक महिन्यात दाखवली असल्याचे ग्रामीण भागातून त्यांचे कौतुक होत आहे.
